शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

गुडईअर, सार्वजनिक बांधकाम संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:40 IST

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने आय.जी.टी.आर. संघावर ४ गडी राखून मात केली. अन्य लढतींत सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा, डी.आय.ए.जी.ई.ओ.ने एमआयटी हॉस्पिटल संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात संतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

ठळक मुद्देसंतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने आय.जी.टी.आर. संघावर ४ गडी राखून मात केली. अन्य लढतींत सार्वजनिक बांधकाम विभागाने वैद्यकीय प्रतिनिधी संघाचा, डी.आय.ए.जी.ई.ओ.ने एमआयटी हॉस्पिटल संघावर विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात संतोष राऊत, ऋषिकेश तरडे, नीरज देशपांडे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात डीआयएजीईओ संघाविरुद्ध एमआयटीने १६.३ षटकांत सर्वबाद ९४ धावा केल्या. त्यांच्याकडून धीरज थोरातने ३५ चेंडूंत ७ चौकारांसह ४३, तर साईनाथ डहाळेने १४ धावा केल्या. डीआयएजीईओतर्फे संतोष राऊतने ११ धावांत ३ गडी बाद केले. त्याला तोडीची साथ देत हर्षवर्धन काळे याने २० धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीआयएजीईओने विजयी लक्ष्य १९ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून मिथुन रामगीरवार याने २४ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह २७ व संतोष राऊतने नाबाद १५ धावा केल्या. एमआयटीतर्फे रोहन शहा याने १४ धावांत ३ व आकाश लोखंडे व साईनाथ डहाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसऱ्या सामन्यात गुडईअरविरुद्ध आयजीटीआरने २० षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश तरडे याने ५९ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५९ धावा केल्या. गौरव शिंदेने ४३ चेंडूंत ६ चौकारांसह ४६ धावांचे योगदान दिले. गुडईअरकडून कमलेश कालवावे याने २७ धावांत २ गडी बाद केले. प्रदीप यादव व अजित महालिंगा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १७.२ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून जालिंदर हिवराळेने ३१ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३८ धावा केल्या. प्रदीप यादवने २१ व असिफ खानने १९ धावांचे योगदान दिले. आयजीटीआरकडून महेश वझे व ऋषिकेश तरडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १६ व २२ धावा मोजल्या.तिसºया सामन्यात वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाने प्रथम फलंदाजी करताना १९ षटकांत सर्वबाद ११६ धावा केल्या. त्यांच्याकडून सौरभ लड्डा याने ५२ चेंडूंत ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. विनोद शाहूराजेने ३ चौकारांसह १८ धावांचे योगदान दिले. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नीरज देशपांडेने ९ धावांत ४ गडी बाद केले. मनोज घोडेके व रवींद्र तोंडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे १८ व १९ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाने विजयी लक्ष्य १५.३ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून योगीराज चव्हाण याने चौफेर टोलेबाजी करीत २२ चेंडूंतच ३ चौकार व ३ टोलेजंग षटकारांसह ४० धावांची स्फोटक खेळी केली. अजिंक्य दाभाडे, रवींद्र तोंडे, मनोज घोडके आणि योगेश राठी यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले. वैद्यकीय प्रतिनिधी अ संघाकडून आनंद वाडशेलारने २६ धावांत ३ गडी बाद केले. विनोद शाहूराजे, महेश जाधव आणि सौरभ लड्डा यंनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून विष्णू बब्बीरवार, गंगाधर शेवाळे, महेश सावंत, उदय बक्षी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अजित कुमार यांनी केले.