शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

मराठीला अभिजात नव्हे, बहुजात भाषेचा दर्जा द्या-जैमिनी कडू

By admin | Updated: March 2, 2015 00:51 IST

जालना : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. परंतु अभिजात हा शब्द केवळ उच्चवर्णीयांमध्ये वापरला जाणारा आहे.

जालना : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. परंतु अभिजात हा शब्द केवळ उच्चवर्णीयांमध्ये वापरला जाणारा आहे. राज्यात बहुजन समाज मोठ्या संख्येने असल्याने अभिजात ऐवजी बहुजात मराठी भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांनी केली. या मागणीसाठी बहुजन समाजाने अग्रेसर व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात पहिले राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील विचारवंत रमेश राक्षे होते. स्वागताध्यक्ष म्हणून डेव्हीड घुमारे, सीटू संघटनेचे अध्यक्ष अण्णा सावंत, महात्मा फुले समता परिषदेचे मराठवाडा संघटक साहेबराव खरात, दलितमित्र उत्तमराव बैसने, चंद्रकांत वानखेडे, अ.भा. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक चोपडे, दिनकर घेवंदे, ज्येष्ठ समाजसेवक आर.डी. खंदारे, राजाभाऊ देशमुख आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.कडू पुढे म्हणाले की, संस्कृतमध्ये अभिजात म्हणजे ब्राह्मण. त्यामुळे केवळ साडेतीन टक्के लोकांसाठीच अभिजात या शब्दाचा आग्रह का? असा सवाल त्यांनी केला. संस्कृत भाषेच्या एका विद्यापिठासाठी राज्य सरकार दरवर्षी ४० कोटींचा निधी खर्च करते. तेव्हा लोकभाषांसाठीही स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रात आणि राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार आले आहे. रा.स्व. संघाचे विचार विषारी असल्याचा आरोप करून कडू म्हणाले, राज्यात नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे मारेकरी सरकारला सापडत नाहीत, हे दुर्दैव असल्याची टिकाही कडू यांनी केली. राज्यात पुरोगामी चळवळ, सत्यशोधक चळवळ आज अपयशी असल्याचे कारण या मानसिकतेच्या विचारांची व्होट बँक नाही, असेही कडू म्हणाले. स्वागताध्यक्ष घुमारे म्हणाले, मुक्ता साळवे यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या निबंधातून धर्मचिकित्सा केली. खरे तरे हे साहित्य लोकांसमोर येऊ दिले गेले पाहिजे होते. मात्र ते आले नाही, अशी खंत व्यक्त केली. उपेक्षित समाजाने प्रत्येक क्षेत्रात श्रेष्ठत्व सिद्ध करावे, अशीच व्यवस्था वेळोवेळी निर्माण केली जात असल्याचे ते म्हणाले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून राक्षे यांनी मुक्ता साळवे साहित्य संमेलन प्रथमच होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून अशा साहित्य संमेलनाची राज्यात सर्वत्र गरज असल्याचे प्रतिपादन केले. वानखेडे यांनी हे संमेलन म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठी देणगी असल्याचे सांगितले. यावेळी प्रा.डॉ. रावसाहेब ढवळे, सुधाकर निकाळजे, संयोजक राजेंद्र घुले, अशोक घोडे, संतोष गाजरे, अ‍ॅड. बी.एम. साळवे, मधुकर मोकळे, किशोर घोरपडे, वसंत साळवे, रोहिदास गंगातिवरे, राम गायकवाड, पी.के. आर्सुड, लहाने, प्रशांत आढाव, प्रमोद खरात आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)