शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

बोगस कार्डधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: February 10, 2015 00:30 IST

बाळासाहेब जाधव , लातूर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार लातूर विभागाच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी दोन बोगस कार्डधारकांविरुद्ध

बाळासाहेब जाधव , लातूरपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार लातूर विभागाच्या सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी दोन बोगस कार्डधारकांविरुद्ध शिवाजी नगर पोलिसात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे़ एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या पाचही आगाराअंतर्गत तीन पथकातील अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई सुरु केली होती़ परंतु, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बोगस कार्डधारक आढळून येताच संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही गुन्हा दाखल करण्याच्या कामात गती येत नव्हती, याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच अनेक बोगस कार्ड जप्त करुन २ लाख ५० हजाराचा दंड वसूल करण्यात आला़ तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी ४़२० वाजता एमएच २० बीएल २८८७ पुणे ते लातूर या मार्गावर शिवाजी चौक लातूर येथे बस थांब्यावर प्रवाशी उतरत असताना सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे, एम़ए़पाटील, जी़बी़ ढेकणे, आऱईक़ांबळे, चालक ओ़बी़गिरी यांच्या उपस्थितीत पथकाने अपंग व ज्येष्ठ नागरिक बनावट ओळखपत्राची तपासणी करुन बाभळगाव येथील बबन ज्ञानदीप मिस्के व अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील दिनकर श्रीनिवास गादेवार यांच्याकडील बनावट अपंगाचे कार्ड जप्त करण्यात आले़ या प्रकरणी एसटीचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक सिद्धेश्वर रासुरे यांनी शिवाजी नगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघाविरुद्ध शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ एसटी महामंडळाच्या वतीने बोगस कार्ड जप्त करण्यात आले असून, दंडापोटी २ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात आले़ परंतु गुन्हा दाखल करण्यास अडचणी येत होत्या़ परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्याने सोमवारी दुपारी अपंगाचे बनावट कार्ड वापरणाऱ्या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ मराठवाड्यातील ही पहिलीच गुन्हा दाखल करण्याची घटना आहे़