शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

ड्रोनद्वारे पीक परिस्थितीचा अंदाज

By admin | Updated: August 20, 2015 00:46 IST

उस्मानाबाद : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पीक उत्पादनाचे अधिक अचूक व कमी वेळेत आकलन करुन भरपाई देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे

उस्मानाबाद : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पीक उत्पादनाचे अधिक अचूक व कमी वेळेत आकलन करुन भरपाई देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादनाचे मुल्यमापन करण्यात येत असून, मराठवाड्यात औरगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुका तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी या गावातील पिकांच्या उत्पादनाचे मुल्यमापन व परिस्थिती ठरविण्यासाठी ड्रोनव्दारे बुधवारी पाहणी करण्यात आली.राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप २०१५ या हंगामात राबविण्यासंबधी मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली २५ मे २०१५ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यासंबंधीचा आदेश ४ जून २०१५ रोजी निर्गमित करण्यात आला होता. सदर समितीच्या बैठकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर करुन पीक उत्पादनाचे अधिक अचूक व कमी वेळात आकलन करुन भरपाई देण्याच्या दृष्टीने आणि राष्ट्रीय कृषी विमा योजना गावास्तरावर राबविण्यासाठी प्रायोगिक स्वरुपात संशोधन व अभ्यास करुन नुकसान भरपाई ठरविण्यासंबंधी नवीन पध्दतीनुसार उत्पादनाचे निष्कर्ष व प्रचलित पध्दतीनुसार यांची तुलना करुन त्याच्या अचूकतेचा अभ्यास करुन वापर करण्यात येत आहे.यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी, पाडोळी, तेर, उस्मानाबाद ग्रामीणमधील जागजी, बेंबळी महसूल मंडळाची निवड करण्यात आली आहे. या महसूल मंडळामध्ये प्रचलित पध्दतीनुसार राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगव्दारे प्राप्त उत्पादनाच्या आकडेवारी एवढीच ग्राम पातळीवरील नवीन पध्दतीनुसार प्राप्त आकडेवारी जास्त संयुक्तिक असली तरच ते गाव नुकसान भरपाई ठरविण्यात येणार आहे. तसेच संबधित संस्थांकडून गाव पातळीवर पीक उत्पादनाचे निष्कर्ष प्राप्त न झाल्यास वा संयुक्तिक नसल्यास किंवा अन्य काही कारणाने गाव पातळीवर आकडेवारी वापरता येणार नसल्यास नुकसान भरपाई ठरविण्यासाठी प्रचलित पध्दतीचा अवलंब करुन नुकसान भरपाई निश्चित होणार आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पिपंरी येथील पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले ड्रोन आकाशात कसे उडते हे पाहण्यासाठी ग्रामंस्थानी व लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आधुनिक यंत्राव्दारे मुल्यामपन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. उस्मानाबाद तालुक्यातील पिंपरी गावातील पिकांचे मुल्यमापन करण्यासाठी ड्रोनव्दारे पाहणी करण्यात आली. ड्रोनव्दारे १५० मिटरवरुन पिकांचे छायाचित्र घेत व तसेच पिकांच्या उत्पन्नाचा अंदाज घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत फक्त ड्रोनव्दारे घेण्यात आलेल्या पिकांची छायाचित्रे व पीक परिस्थितीचा अहवाल शासनास सादर करण्यात येत आहे. तसेच गुरुवारी उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील पिकांची छायाचित्रे ड्रोनव्दार घेण्यात येणार आहेत. यासाठी दिल्ली येथील नोएडा येथील कंपनीची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सांगितले.सदरील तंत्रज्ञाच्या आधारे उत्पादनाचे मुल्यमापन ठरविण्यासाठी शासनाकडून जिल्ह्यातील सहा मंडळातील ९९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी महसूल मंडळातील ढोकी, वाखरवाडी, कसबे तडवळे, कोंबडवाडी, गोपाळवाडी, दुधगाव, जवळा (दु), येडशी, गोवर्धनवाडी, कावळेवाडी, बुकनवाडी, कोल्हेगाव, रुईढोकी, किणी, तुगाव, बावी ढोकी, पाडोळी मंडळातील टाकळी बे, समुद्रवाणी, लासोना, मेंढा, घुगी, कामेगाव, राजूरी सांगवी, महालिंगी, चिखली, बोरगाव राजे, नितळी, कोंड, येवती, सारोळा (बु), नृसिंहवाडी, बालपिरवाडी, तेर मंडळातील हिंगळजवाडी, डकवाडी, मुळेवाडी, वाणेवाडी, वाघोली, पवारवाडी, काजळा, कोळेवाडी, भंडारवाडी, उपळा मा, वरुडा, खेड, कौडगाव, खामगाव, उस्मानाबाद ग्रामीण जुनोनी, अंबेहोळ, वलगुड, कौडगाव, अंबेजवळगे, घांटग्री, सोनेगाव, भानसगाव, चिलवडी, झरेगाव, पिंपरी, सुर्डी, पोहनेर, गावसुद, बेगडा, आळणी, कुमाळवाडील भडाचीवाडी, जागजी मंडळातील पळसप, घोगरेवाडी, भि.सारोळा, मोहतरवाडी, तावरजखेडा, टाकळी , आरणी, सुंभा, इर्ला, दारफळ, दाऊतपूर, रामवाडी, बेंबळी सर्कल मधील कनगरा, पंचगव्हाण, भंडारी, धुता, ककासपूर, नांदुर्गा, आंबेवाडी, विठ्ठलवाडी, महादेववाडी, रुईभर, बरमगाव, अनसुर्डा, गौडगाव, मेडसिंगा शेकापूर आदी गावांचा समावेश आहे.