संजय कुलकर्णी , जालना जालना लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघांच्या प्रत्येकी २२ तर बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या २५ फेर्या झाल्या. मात्र या प्रत्येक फेरीत सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे आघाडीवर होते. काँग्रेस आघाडीचे विलास औताडे हे सलग दुसर्या क्रमांकावर होते. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला. सुरूवातीला टपाल मते वेगळी करण्यात आली. त्यानंतर पहिल्या फेरीत औताडेंपेक्षा दानवेंना १४ हजार २३५ मतांनी आघाडी मिळाली. तेथूनच महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू झाला. दुसर्या फेरीत २४ हजार ७००, तिसर्या फेरीत ३५ हजार ८३७, चौथ्या फेरीत ४३ हजार ९२२ अशी दानवेंचे मताधिक्यवाढत गेले. या फेरीअखेर औताडे यांना एकूण ६६ हजार ८२३ तर दानवेंना १ लाख १० हजार १७ मते मिळाली होती. तर अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे शरदचंद्र वानखेडे यांना ५ हजार ६२७, सपाचे कुंजविहारी अग्रवाल यांना ५२९, आपचे दिलीप म्हस्के यांना ६०१, महंम्मद जावेद यांना १७२१, ज्ञानेश्वर नाडे यांना १२९० तर बाबासाहेब पाटील यांना १२१६ मते मिळाली. पाचव्या फेरीत ५१ हजार ६००, सहाव्या फेरीत ५९ हजार ५४६, सातव्या फेरीत ६९ हजार ९, आठव्या फेरीत हे मताधिक्य ७८ हजार २८७ हजारांवर पोहोचल्याने दानवेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे दिसून आले. या फेरीअखेर औताडे यांना १ लाख ३६ हजार ६९ तर दानवे यांना २ लाख १४ हजार ३५६ मते मिळाली. नवव्या फेरीअखेर ९१ हजार १५०, दहाव्या फेरीअखेर ९८ हजार २४२, अकराव्या फेरीअखेर १ लाख १ हजार ९६३ मताधिक्य मिळाले. या फेरीअखेर औताडे यांना १ लाख ९२ हजार ४९६ तर दानवे यांना २ लाख ९४ हजार ४५९ मते मिळाली. अन्य २१ उमेदवारांच्या मतांचे आकडे दानवे आणि औताडे यांच्या मतांपासून प्रचंड दूर अंतरावर होती. बाराव्या फेरीत दानवेंनी १ लाख १३ हजार ५०९, तेराव्या फेरीत १ लाख २० हजार ५६०, चौदाव्या फेरीत १ लाख ३० हजार ८१७, पंधराव्या फेरीत १ लाख ३९ हजार ५८१, सोळाव्या फेरीत १ लाख ४९ हजार ४६२, सतराव्या फेरीत १ लाख ५९ हजार ८३९, अठराव्या फेरीत १ लाख ६५ हजार ८७५ तर एकोणिसाव्या फेरीत १ लाख ७६ हजार ७१६ मताधिक्य दानवेंना मिळाले. विसाव्या फेरीत १ लाख ८८ हजार ६८, एकविसाव्या फेरीत १ लाख ९२ हजार ७६८, बाविसाव्या फेरीत २ लाख ६ हजार ९५२ मतांची आघाडी मिळाली. बदनापूरच्या तेविसाव्या फेरीत २ लाख ११ हजार ५०७, चोविसाव्या फेरीत २ लाख १२ हजार ८८७ तर पंचविसाव्या फेरीत २ लाख १३ हजार ४२३ मतांची आघाडी मिळाली. टपाल मतांमध्येही दानवे यांना ५७९ मते मिळाली.
प्रत्येक फेरीत मताधिक्याचा चढता आलेख
By admin | Updated: May 17, 2014 00:20 IST