शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुलाच्या साक्षीवरून बापाला जन्मठेप

By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST

औरंगाबाद : स्वत:च्या मुलाचा गळा चिरून त्याचा खून करणाऱ्या निर्दयी बापाला दुसऱ्या मुलाच्या साक्षीवरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

औरंगाबाद : स्वत:च्या मुलाचा गळा चिरून त्याचा खून करणाऱ्या निर्दयी बापाला दुसऱ्या मुलाच्या साक्षीवरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुमंत कोल्हे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.हेमराज बाबू राठोड (३५, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, उप्पलखेडा येथील रहिवासी असलेला आरोपी हा पत्नी लताबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्याला दारूचे व्यसन असून तो सतत पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करीत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून ती माहेर असलेल्या निलजखेडा तांडा (ता. जामनेर, जि. जळगाव) येथे मुलगा अजय (वय ११) आणि विजय (५) यांच्यासह राहण्यास गेली होती. १६ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपी हेमराज हा निलजखेडा तांडा येथे गेला आणि पत्नी आणि दोन्ही मुलांना गावी चालण्याचा तगादा लावू लागला. पत्नीने उप्पलखेडा येथे त्याच्या सोबत जाण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दोन्ही मुलांना बसस्थानकावर खाऊ घेऊन देतो, असे सांगून त्यांना सोबत घेऊन गेला. त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास पळसखेडा शिवारातील (ता. सोयगाव) रस्त्याशेजारील गरमल लाला राठोड यांच्या शेतात दोन्ही मुले बेवारस अवस्थेत पडलेली असल्याचे दूधविक्रेता राजू मरमट यांना दिसली. त्यांनी ही बाब गावकरी आणि सोयगाव पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा ११ वर्षीय अजयचा करवतीने गळा चिरून खून करण्यात आल्याचे तसेच विजयचा गळा आवळून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो काही वेळानंतर शुद्धीवर आला. त्याने वडिलांनीच अजयचा खून केल्याचे तसेच त्याचाही गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी लताबाई राठोडच्या तक्रारीवरून आरोपी हेमराज राठोड विरोधात खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सी.पी. नागरगोजे यांनी तपास करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी न्यायाधीश सुमंत कोल्हे यांच्यासमोर झाली तेव्हा सरकारपक्षाकडून सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाट यांनी सहा साक्षीदार तपासले. याप्रसंगी चिमुकल्या विजयची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याच्या साक्षीवरूनच स्वत:च्या निर्दयी हेमराजला खुनाच्या आरोपावरून जन्मठेप आणि ५०० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने कारावास, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ३०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. (प्रतिनिधी)