शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

शेतमशागत, पेरणीची लाकडी अवजारे झाली हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:04 IST

केशव जाधव बनकिन्होळा : ग्रामीण भागात पूर्वी शेतीची मशागत करण्यासह पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडांपासून बनविली जात ...

केशव जाधव

बनकिन्होळा : ग्रामीण भागात पूर्वी शेतीची मशागत करण्यासह पेरणीसाठी वापरली जाणारी सर्व अवजारे ही लाकडांपासून बनविली जात होती. मात्र, विज्ञानामुळे प्रगती झाल्याने आधुनिकीकरणाचे वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहे. आज बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत किंवा पेरणी करीत असले तरी, बैलांच्या सहाय्याने शेती हाकणाऱ्या शेतकऱ्यांकडील लाकडी अवजारे हद्दपार झाली असून त्यांची जागा लोखंडी अवजारांनी घेतली आहे. यामुळे यावर अवलंबून असणारा सुतारांचा व्यवसायही बुडाला आहे.

उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात नवीन लाकडी अवजारे बनविण्यासाठी तसेच जुन्या अवजारांची डागडुजी करण्यासाठी सुतारांकडे शेतकऱ्यांच्या रांगा लागत होत्या. पूर्वी धान्याच्या रुपाने व नंतर पैशांच्या रुपाने ही अवजारे बनवून मिळत असत. यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चे लाकूड आणून द्यावे लागे. यातून सुतार वखर, तिफन, कोळपे, लगड, बैलगाडी आदी अवजारे बनवून देत. मात्र, कालौघात नवनवीन उपकरणांचा शोध लागत गेला, तशी शेतकऱ्यांना लागणारी अवजारेही लोखंडापासून बनविली जाऊ लागली. लोखंडी नळ्यांपासून बनविले जाणारे वखर, तिफन, कोळपे हे वजनाने हलके, तसेच सोपे व सुटसुटीत असल्याने शेतकऱ्यांचा कल नंतर तिकडे झुकला. मात्र, याही पुढे नंतर यांत्रिक युग आल्याने ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरणीकडे शेतकरी वळले आहेत. मात्र, अजूनही कोळपणी व वखरणीसाठी बैलांचा उपयोग करावाच लागतो. मात्र, आता लाकडी अवजारे काळाच्या पडद्याआड गेली आहेत.

चौकट

डिझेल महागल्याने ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी ट्रॅक्टरद्वारे मशागत व पेरणी करीत आहेत. यात वेळ व श्रम वाचतात. मात्र, यंदा डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ट्रॅक्टरमालकांनी मशागतीचे दर वाढविले आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले असून ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, ते पुन्हा बैलांच्या सहाय्याने पेरणी करीत आहेत.

चौकट

सुतारांचे कामठे झाले सुने सुने

पूर्वीच्या काळात ग्रामीण भागात सुतार कारागिर जेथे काम करीत, त्या भागाला कामठा असे म्हणत. पावसाळ्याच्या सुरुवातीला या कामठ्यांवर शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असे. कोणी नवीन अवजारे बनविण्यासाठी येत तर कोणी वखर, तिफन, कोळप्यांच्या दांड्या बसविण्यासाठी येत. यावेळी सर्वजण सुतार कारागिरांची मनधरणी करताना दिसून येत. मात्र, लोखंडी अवजारे आल्यानंतर हळुहळू सुतारांचा व्यवसाय अडगळीत पडला. आजघडीला हे कामठे सुने सुने झाले असून सुतारांचा पारंपरिक व्यवसाय बुडाला आहे. पोटापाण्यासाठी त्यांना इतर व्यवसायांकडे वळावे लागले आहे.

फोटो :