उदगीर : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या टंचाई बैठकीतील सूचनेनुसार जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी उदगीर तालुक्यातील १२ प्रकल्पांतून शेतकऱ्यांना पाणी उपसण्यास मुभा दिली आहे़ १० ते १४ डिसेंबर या कालावधीतच पाणी घेण्याचे प्रशासनाने कळविले आहे़४ डिसेंबर रोजी झालेल्या टंचाई आढवा बैैठकीत शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी देण्याची मागणी केली होती़ त्याअनुषंगाने उदगीर तालुक्यातील तिरु व देवर्जन मध्यम प्रकल्प तसेच एकुर्का, पिंपरी, कल्लूर, नागलगाव, केसगीरवाडी, गुरधाळ, निडेबन, डाऊळ हिप्परगा, कोदळी, वागदरी या साठवण तलावातून पाच दिवस पाणी उचलता येणार आहे़ त्यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे़ एकंदर प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यानुसार हा पुरवठा करण्यात येत असल्याचेही कळविण्यात आले आहे़ (वार्ताहर)
पाणी उपसण्याची शेतकऱ्यांना मुभा
By admin | Updated: December 10, 2014 00:40 IST