बालासाहेब काळे, हिंगोलीसध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून मागील काही निवडणुकांचा आढावा घेतला असता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली, वसमत व कळमनुरी तब्बल ४३ उमेदवारांचा समावेश होता. यात अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रसिद्ध कवी फ.मुं.शिंदे यांनी जनता दलातर्फे भाग घेतला होता.कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली विठ्ठलराव चंपतराव नाईक (मस्के) यांनी कम्युनिस्ट पार्टी आॅ.ई.कडून निवडणूक लढवून ४५ हजार ५३१ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अॅड.शिवाजी माने यांना ३७ हजार १४४ मते मिळाली होती. फ.मुं.शिंदे यांना २ हजार ५३८ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गंगाराम जाधव यांना ८ हजार ९७७ तर रिपाइंचे जयाजी पाईकराव यांना १ हजार ८५६ मते मिळाली. या निवडणुकीत १५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यात गणेशराव बळवंत यांना अपक्षांमधील सर्वाधिक १० हजार ८४५ मते मिळाली. वसमत मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी ५३ हजार ५१४ मते घेऊन विजय मिळवला होता. भारिप- बहुजन महासंघाचे मारोती पिसाळ यांना २५ हजार २१० मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सखाराम बागल यांना ९ हजार ४२३ तर अपक्ष म्हणून लढलेले जयप्रकाश दांडेगावकर यांना १४ हजार २६० मते मिळाली होती. या निवडणुकीच्या रिंगणात १५ अपक्ष होते. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये भाजपाचे उमेदवार बळीराम पाटील कोटकर यांनी ३६ हजार २५७ मते घेऊन विजय संपादन केला होता. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील यांना ३३ हजार २०७ तर भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार माधवराव नाईक यांना २५ हजार २५१ मते मिळाली होती. जनता दलाचे केशव राठोड यांना ४ हजार ९५५ तर दूरदर्शी पार्टीचे ज्ञानदेव चौधरी यांना १ हजार ३९५ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढा दिला.
फ.मुं.शिंदे यांनीही लढवली होती निवडणूक
By admin | Updated: September 29, 2014 00:06 IST