तळणी : मंठा तालुक्यातील तळणी जिल्हा परिषद गटाला पीक विमा योजनेतून वगळल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खरीप हंगाम २०१३-१४ मध्ये २ हजार ६१४ शेतक ऱ्यांनी ६ लाख ७४ हजार २१० रुपयांचा पीक विमा काढला होता. मात्र, दुष्क ाळ,अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होऊ नही पीक विम्यातून तळणी सर्क ल वगळण्यात आल्याने शेतक ऱ्यांना पुन्हा धक्क ा बसला आहे. मागील वर्षी आधी दुष्काळानं ...नंतर अतिवृष्टीने ...अन् अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले होते.अतिवृष्टीची पाहणी दोऱ्यात कृषी विभागाने शेतक ऱ्यांनी पीक विमा भरावा, असे आवाहन केले होते. त्यामुळे शेतक ऱ्यांनी मोठ्या आशेने पीक विमा भरला होता. जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त खरीप हंगाम २०१३-१४ साठी १ हजार ११९ शेतकऱ्यांनी ६ लाख ७४ हजार २१० रुपयांचा पीक विमा काढला होता असल्याचे शाखाधिक ारी राजेश म्हस्के यांनी सांगितले.मागील वषी शेतक ऱ्यांचे झालेले भरुन निघणारे नसले तरी पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता मात्र, पीक विम्यातून तळणी सर्कल वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा धक्का बसला असल्याचे पं.स. सदस्य किसनराव मोरे, पं.स. सदस्य सुरेश सरोदे यांनी सांगितले. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. असे असताना पुन्हा पीक विम्यातून सर्कलच वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचे शेतक री शिवाजी गुजर, दिलीप लाड, दत्तराव खरात, बाबासाहेब सदावर्ते, भगवान चाटे यांनी सांगितले. तालुक ा कृ षी अधिक ारी ज्ञानेश्वर बरदे यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. (वार्ताहर)शेतकऱ्यांसोबत झालेला प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून केली जात आहे. कृषी विभाग व बँक यांच्यात समन्वय नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तळणी सर्कलचा समावेश पीक विमा योजनेत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.पीक सभासदभरणा सोयाबीन१०२३२ लाख ८१ हजार ८१८ रुपयेक ापुस२१७१ लाख ८६ हजार रुपयेमुग६४७९० हजार ६२७ रुपयेउडिद५२९७६ हजार ७०० रुपये तुर११०३० हजार ५० रुपयेबाजरी८७९ हजार रुपये ज्वारी११५ रुपये
पीकविम्यातून तळणीला वगळले
By admin | Updated: August 25, 2014 01:36 IST