उस्मानाबाद : तालुक्यातील बेंबळी येथे बांधण्यात आलेली पोलिस वसाहत मुदत संपण्यापूर्वीच खचली असून, केवळ डागडुजीवर खर्च करण्यात येत आहे़ अधिकाऱ्यांसह तीर निवासस्थाने चांगल्या अवस्थेत असून, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची मात्र, मोठी हेळसांड होत आहे़तब्बल ४७ गावातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या बेंबळी येथील पोलिस ठाण्यात दोन अधिकाऱ्यांसह जवळपास ३० कर्मचारी कार्यरत आहेत़ येथे काही वर्षापूर्वी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १९ निवासस्थाने बांधण्यात आली होती़ मात्र, बांधकामानंतरची मुदत संपण्यापूर्वीच या इमारती पूर्णत: खराब झाल्या आहेत़ गत जवळपास चार ते पाच वर्षापासून येथे केवळ अधिकाऱ्यांचे एक व कर्मचाऱ्यांची दोन निवासस्थाने सुस्थितीत आहेत़ या निवासस्थानांच्या डागडुजीवरच नेहमी खर्च करण्यात येतो़ नवीन बांधकामाचा प्रस्तावही नियमांच्या कचाट्यात सापडला आहे़ पूर्वीची मुदत संपली नसल्याने केवळ डागडुजीचा अवलंब करण्यात येत आहे़ निवासस्थानात वाढलेले गाजर-गवत पाहता राहत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुुंबांनाही जीव मुठीत घेवून वावरावे लागत आहे़ उर्वरित कर्मचारी गावात इतरत्र किंवा उस्मानाबाद शहरात रूम करून राहतात़ त्यामुळे नोकरी करून संसार हाकताना या कर्मचाऱ्यांना तारेवची कसरत करावी लागत आहे़बेंबळी पोलिस ठाण्यांतर्गत बेंबळी, पाटोदा, करजखेडा, पाडोळी, कनगरा या मोठ्या गावांसह ताकविकी, रूईभर, टाकळी, लासोणा आदी ५१ गावातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम पाहिले जाते़ मात्र, या ठाण्यात एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक फौजदार व इतर ३० कर्मचारी कार्यरत आहेत़ कार्यालयीन कामकाज व इतर बंदोबस्त पाहता ठाण्यात केवळ आठ ते दहा कर्मचारी उपस्थित राहतात़ त्याच कर्मचाऱ्यांना घेवून अधिकाऱ्यांना कामकाज पहावे लागत आहे़वरिष्ठांकडे पाठपुरावा४बेंबळी येथील पोलिस वसाहतीची दूरवस्था झाली आहे़ उपलब्ध घरांची डागडुजी काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे़ इतर घरांचे बांधकाम व्हावे, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सपोनि प्रशांत पाटील यांनी सांगितले़
कर्मचारीही अपुरे मुदत संपण्यापूर्वीच दुरावस्था
By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST