शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

शानादेश बेदखल

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

कडा : डेंग्यू सारख्या भयानक रोगाने कोणाचा बळी न जाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना

कडा : डेंग्यू सारख्या भयानक रोगाने कोणाचा बळी न जाता त्याला आटोक्यात आणण्यासाठी उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून रुग्णांना सेवा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी न राहता रूग्णांना वाऱ्यावर सोडून ये- जा करत आहेत.येथील निवासस्थानात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वास्तव्य नसल्याने रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश खाकाळ यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सव्वादोन लाख नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ११६ पैकी केवळ ५१ कर्मचाऱ्यांवरच असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर पदे ११६ असताना देखील ६५ पदे रिक्त आहेत. अशी भयावह परिस्थिती असताना अधिकारी मुख्यालयी राहणे पसंत करत नाहीत. प्रा.आ. केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्चून प्रशासनाने निवासस्थाने उभारली आहेत. परंतु अधिकारी , कर्मचारी यात राहत नसल्याने ही निवासस्थाने ओस पडलेली आहेत. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू चाबुकस्वार यांना विचारणा केली असता सर्वांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असून न राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)