शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला.

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला. गतवर्षी लाखो रूपये खर्च करूनही ३०० एकरात २८६ क्विंटलाचे नाममात्र उत्पादन निघाले. आजघडीला चिकित्सालयाच्या जमिनीत सध्याचे तण पाहता यंदाही ‘दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ’ उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाचीच ही बोंब असेल तर इतरांनी त्यांचे सल्ले ऐकले तर ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ ही बोंब होईल.देशाची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असल्याने कृषी विभागाला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले. स्थानिक ठिकाणीच उत्पादकांना शेतीबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा कृषी विभागात शेतकऱ्यांच्या राबता असतो. याहीपुढे जाऊन शासनाने उत्पादकांना बांधावरच तंत्रज्ञान मिळावे, या उद्धेशाने कृषी चिकित्सालयाची स्थापना केली. जिल्ह्यात त्यानुसार हिंगोली, बासंबा, आखाडा बाळापूर, वसमत आणि गोळेगावात चिकित्सालयाच्या जमिनी आहेत. त्यावर विविध प्रात्यक्षिके करता यावीत, अधिकाऱ्यांना स्व अनुभव घेऊन तो शतेकऱ्यांना सांगता यावा, अधिकाअधिक उत्पादन काढून उत्पादकांना दाखविता यावे, शेतकऱ्यांनाही ते उघड्या डोळ्याने पाहता यावे आणि त्यातून बियाणे तयार करण्यासाठी उत्पादनही घेता यावे, या उद्देशासाठी या जमिनी महत्त्वाच्या आहेत; परंतु यातील एकही उद्देश साध्य होताना दिसत नाही. मागील वर्षी केवळ २८६ क्विंटल उत्पादन ३०० एकरात निघाले. एकाही ठिकाणी समाधानकारकच नव्हे तर सांगण्याजोगाही उतार आलेला नाही. हरभऱ्याचे एकूण उत्पादन ३ क्विंटल झाल्याची नोंद कृषी विभागात सापडते. पैैशांची, तंत्रज्ञानाची आणि वेळेची कमतरता नसतानाही प्रत्येक ठिकाणी तणाने शेत खाल्ले. बहुतांश अधिकाऱ्यांचे परजिल्ह्यातून अपडाऊन असल्याने बाहेरगावच्या ठिकाणची पिके पाहण्यासाठी कदाचित अधिकाऱ्यांना वेळ नसवा; पण जिल्हा कार्यालयाच्या पाठीमागील पीकही त्यांना दिसत नाही, हे विषेश. (वार्ताहर)जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी हे काम पाहतात म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविले. तद्नंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी बाहेरगावी असून गत वर्षी नव्हतो, म्हणून हात वर केले.