शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

ड्युटीवर सिस्टर, दौऱ्यावर डॉक्टर

By admin | Updated: August 26, 2014 01:57 IST

हिंगोली : गावातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून स्थापन केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच सलाईनची गरज आहे. कुठे वैैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नाहीत

हिंगोली : गावातच दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या म्हणून स्थापन केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच सलाईनची गरज आहे. कुठे वैैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नाहीत.तर कुठे असूनही ड्युटी नावालाच करतात. काही निवासस्थानाअभावी ते अप-डाऊनमध्ये मग्न. त्यात भरडले जातात ते अडले-नडले, गोरगरीब रुग्ण. त्यांना किरकोळ आजारावर उपचारासाठी शहरात जावे लागते. मोठा भुर्दंड सोसावा लागतो. नाहीतर परिचारिकांनी केलेल्या उपचारावर समाधान मानावे लागते असा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला.औषध निर्माताच कारभारीरामेश्वर तांडा : येथील आरोग्य केंद्रास दुपारी १२ वाजता भेट दिली असता विद्यार्थ्यांना औषध निर्माता के.एच. आलेवार गोळ्या वाटप करताना दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीविना हा प्रकार सुरू होता. केंद्रात आरोग्य सेवक एस.व्ही. लाकडे, आरोग्य सहायिका डी.पी. पत्की सोडल्या तर एकही अधिकारी नव्हता. दोनपैकी एक एमओ डॉ. पन्नावर प्रशिक्षणाला गेले तर डॉ. मोसीन लसीकरणासाठी बाहेरगावी गेल्याचे समजले. रात्रीला एकही अधिकारी नसल्याने रूग्णांना शहर गाठावे लागते. ३४ गावांच्या रूग्णांसाठी मसोमध्ये १ रूम, ३ बेडकळमनुरी : तालुक्यातील मसोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेल्या ३४ गावांतील रूग्णांसाठी केवळ ३ बेड असून तेही एकाच रूममध्ये आहेत. येथील इमारतीचे काम २००९ पासून अद्यापही पूर्ण झाले नसल्याने संपूर्ण केंद्र तीन खोल्यांत चालत असल्याचे चित्र दुपारी २ वाजता पाहवयास मिळाले. दररोज २५ ते ३० रूग्णाच्या उपचारासाठी एकच वैद्यकीय अधिकारी आहे. सुट्टी किवा दौऱ्यावर गेल्यावर कर्मचाऱ्यांनाच रूग्णांवर उपचार करावे लागतात. सोमवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पतंगे, एक औषधी निर्माता व परिचर उपस्थित होते. तीन महिला अधिपरिचारिका आणि महिला परिचारिकेचे एक पद रिक्त आहे. जागेअभावी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात महिलांची प्रसूती करावी लागते. (वार्ताहर)वारंगा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील आरोग्य उपकेंद्रास आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असल्याने हीच सर्वात मोठी गैरसोय आहे. ४ या उपकेंद्रास आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी पद गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध असूनही काही उपयोग नाही. डॉक्टर अभावी रूग्णांना तपासणार कोण? असा प्रश्न आहे. ४डोंगरकडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नखाते हे आठवड्यातून तीन - चार वेळा केंद्रास भेट देतात. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी भरण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.४ २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता उपकेंद्रास भेट दिली असता औषध निर्माण अधिकारी, अटेंडर हे दोघेच उपस्थित होते. तर येथील परिचारिका एम.एन. शिपोरकर या गेल्या १५ दिवसांपासून रजेवर असल्याचे समजले. हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा आणि त्यातंर्गतच्या सहा उपकेंद्रात थम मशिन नसल्याने अधिकाऱ्यांना ‘आवो जाओ घर तुम्हारा’ ही म्हण तंतोतंत लागू पडतो. गुंडा येथील उपकेंद्रात कर्मचारी राहत नाहीत. करंजाळ्याचे कर्मचारी परभणी येथून ये-जा करतात. ४सावंगी येथील केंद्राचा भार कंत्राटी कर्मचाऱ्यावर आहे. चिखली केंद्राचे कर्मचारी वसमत येथून ये-जा करत असल्याचे चित्र सोमवारी पाहवयास मिळाले. हट्ट्यात अधिपरिचारिकेचे एक पद रिक्त आहे. ४केंद्रात ओआरएस पावडरचा तुटवडा असल्याचे दिसून आले. दिवसापेक्षा रात्रीच्यावेळी आलेल्या रूग्णाला शहर गाठल्यावाचून पर्याय नसतो. ४४ हजार लोकसंख्या असलेल्या गावात कर्मचारी निवासस्थानी राहत नसून थम मशिनही नसल्याने अधिकाऱ्यांचे फावले आहे. कौठा : वसमत तालुक्यातील कौठा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत एकूण सात गावे असून, ९ हजार २६७ लोकसंख्येचा कार्यभार एकाच परिचारिकेवर असल्याचे आढळून आले. २ कौठा येथील आरोग्य उपकेंद्राला भेट दिली असता तेथे परिचारिका सारडा उपस्थित होत्या. त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांच्याकडे कौठा, किन्होळा, खुदनापूर, बोरगाव (बु.), बोरगाव खु., महमदपूरवाडी, डोणवाडा इत्यादी गावे असल्याचे सांगितले. ३ एवढ्या गावांसाठी एकच परिचारिका असल्याने आठवड्यातील वारांनुसार लसीकरण, गरोदर महिलांची तपासणी आदी कामे करावी लागतात. तसेच महिन्यातून ९ लसीकरण, प्रत्येक आठवड्याला बैठका यामुळे रूग्णसेवेपेक्षा अतिरिक्त कामातच जास्त वेळ जातो, असे आढळून आले. ४ परिचारिके बरोबर एक एमपीडब्ल्यू आंधळे व एक मदतनिस पिंजारी एवढेच कर्मचारी आहेत. अशीच अवस्था बोराळा येथील आरोग्य उपकेंद्राची आहे.