.!गजानन वानखडे, जालनासाक्षर भारत अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या १५८३ प्रेरकांचे गेल्या दोन वर्षाचे मानधन रखडल्याने अनेक जण मोलमजुरी , शेती, तर काहीजण मिस्त्रीचे काम करून पोट भरत आहेत. मकरंद अनासपुरे ,अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला ‘निशानी डावा अंगठा’ या मराठी चित्रपटात दाखविली तशी गत या प्रेरकांची झाली आहे. या चित्रपटात देखील निरक्षरांना साक्षर करण्याचे काम कसे चालते आणि त्याची शासन दरबारी कशी पायमल्ली केली जाते हे दाखविण्यात आले आहे. तीच परिस्थिती जालना जिल्हात साक्षर भारत अभियानात सरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून साक्षरेते काम सुरू असले तरी नेमके किती प्रौढ नागरीक साक्षर झाले आहेत हे संबधीत अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. जिल्ह्यातील आठही तालुक्यात निरक्षरांना शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या १५८३ जणांना दोन वर्षांपासून पगार नाही. केंद्र सरकाने २०१२ साली प्रौढ निरंतर शिक्षण हे नाव बदलून साक्षर भारत अभियान असले नामकरण केले. यासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देते. पंरतु आमच्याकडे निधीच आला नसल्याचे साक्षर भारत अभियानचे प्रकल्प प्रमुख संजय वाळींबे यांनी सांगितले. त्यामुळे पे्ररकांचे मानधन देखील देण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. सध्या मी लाईन फिंटिगचे काम करत आहे. हे काम केले नसते तर उपाशीच राहावे लागले असते, अशी प्रतिक्रिया प्रेरक प्रेरिका संघटनेचे अध्यक्ष समाधान खरात यांनी दिली. ४माझे बी.ए. झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून आम्हाला मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सध्या मी एका दुकानावर काम करत आहे. आमचे मानधन तात्काळ देण्यात यावे अशी आमची मागणी असल्याचे जालन्यातील रतन डोंगरे यांनी सांगितले. ४तीन वर्षापासून मी प्रेरकाचे काम करत आहे. पंरतु मला दोन महिन्यांचे मानधन मिळाले. उर्वरीत मानधनासाठी वारंवार चकरा मारूनही मानधन मिळत नसल्याने मी सध्या शेती करत आहे. पदवी पर्यत माझे शिक्षण झाले आहे. आमच्या गावच्या शाळेत अनेकांनी आम्ही साक्षर करण्याचे काम केले. पंरतु पैसे नसले तर घर कसे चालेल यासाठी मी शेतीचे कामे करत असल्याचे पीरपिळगाव येथील अनिरूध्द खिल्लारे यांनी सांगितले. ४मी एम.ए केले आहे. परंतु नोकरी नसल्याने आणि शिकविण्याची आवड असल्याने मी प्रौढ नागरीकांना गेल्या तीन वर्षापासून शिकवित आहे. परंतु पगार होत नसल्याने मी हे काम थांबविले असल्याचे नेर सावरगाव येथील नेत्रा जोशी यांनी सांगितले. ४माझे बी.ए झाले आहे. सध्या काम नसल्याने मी मिस्त्रीचे काम करत आहे. मी माझ्या तालुक्यात १२ निरंक्षरांना तोडके मोडके का होईना अक्षर ओळख, स्वाक्षरी करणे शिकविले. त्यामुळे नागरीकांना समाधान आहेच परंतु मलाही याचा अभिमान आहे. परंतु या अभिमानाने पोट कसे भरेल, असा सवाल अंबड तालुक्यातील खणेपुरी येथील गणेश एडके यांनी उपस्थित केला. ४गेल्या दोन वर्षाचे मानधन मिळाले नसल्याने मी हे काम सोडले आहे. मानधन दिल्याने नव्याने काम करेल, अशी प्रतिक्रिया अंतरवाला येथील रिना ससाणे यांनी दिली.
मानधन रखडल्याने प्रेरक मजुरीवर..
By admin | Updated: January 23, 2015 00:53 IST