शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

दुष्काळाने लातुरच्या दाळ उद्योगाची उलाढाल २५ टक्क्यांनी घटली

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

सितम सोनवणे, लातूर दाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे

सितम सोनवणे, लातूरदाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ४५ ते ५० लाख क्विंटल डाळीचे उत्पादन यंदा यात २५ टक्क्याने घटून ३० ते ३५ लाख क्विंटलवर जात आहे. यात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. ऐन मोसमात तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या दाल मिलपैकी आता ७० टक्के मिल एका शिफ्टवर आल्या आहेत. दाळ आणि लातूरचे नाते अतूट आहे. लातूरची तूर आणि चना दाळ तर देशात प्रसिध्द होती. एका काळात विकसित झालेल्या या उद्योगात सध्या ८० ते ८५ दाल मिल एकट्या लातूर शहरात आहेत. जिल्हाभरातील हा आकडा १३० च्या घरात आहे. खरिपाने झटका दिला अणि रबीच्या पेरणीतही पावसाअभावी अनिश्चितता आली. त्यामुळे तूरीच्या उत्पादनात घट आणि हरभऱ्याचा पेरा ०.१ टक्क्यावर आला आहे. यंदा कर्नाटकातूनही होणारी तुरीची आवक रोडावली आहे. तिथूनही फक्त मुग, उडीदाचीच आवक वाढली आहे. तूर व हरभऱ्यासाठीही बाहेरच्या जिल्ह्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. परंतु बाहेरही तूर आणि हरभऱ्याचे उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात होणारी अडीच लाख हेक्टर्स क्षेत्रावर तूर तर साडेतीन लाख हेक्टर्सवर हरभऱ्याची लागवड मंदावली आहे. याचा फटका दाय उत्पादनाला बसला आहे. लातूर जिल्ह्यातून जवळपास ४५ लाख क्विंंटल दाळ उत्पादीत केली जाते़ याचा फटका मिलचालकांना बसला असून एकट्या लातूर शहरात ७ ते ८ मिलना कुलूूप लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाभरात हा आकडा २० च्या घरात जातो आहे. दररोज तीन - तीन शिफ्टवर चालणाऱ्या दाळ मिलमधील ६० ते ७० टक्के दाळ मिल या एका शिफ्टवर आल्या असल्याची माहिती हाती आली आहे. लातूरमध्ये ८५ तर उदगीरमध्ये ४० डाळ मिल आहेत़ या दालमिलच्या माध्यमातून दररोज सरासरी १५ हजार ते २० हजार क्विंटल तूर व हरभरा डाळीचे उत्पन्न घेतले जाते़ त्यातही तुरीचा अधिक वाटा होता़ पण सध्यस्थितीत मुग व उडीद यांची आवक असल्याने १० हजार क्विंटलपेक्षाही कमी उत्पादन होत आहे़ या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम हा मनुष्यबळ तसेच एकूण सर्वच यंत्रणेवर होत असल्याने आर्थिक गती मंदावत असल्याचेही डाळ मील मालकांकडून सांगण्यात येत आहे़