शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी आढावा बैठकांचा सुकाळ

By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत आणि मुख्य सचिवांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत टंचाईचा आढावा घेतला जात आहे. महिनाभरात औरंगाबादेत सात बैठका आणि पाच व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाईचे संकटही निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्वत्र पाणी आणि चाऱ्याचा दुष्काळ जाणवत असला, तरी प्रशासकीय पातळीवर आढावा बैठकांचा सुकाळ आहे. ३० जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेच ४ जुलै रोजी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा विभागाची टंचाई आढावा बैठक घेतली. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादेत टंचाईचा आढावा घेतला. केवळ वरिष्ठ मंत्र्यांकडूनच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सातत्याने टंचाईवर खल सुरू आहे. मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी महिनाभरात पाच वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या. आढाव्याचा हा सिलसिला स्थानिक पातळीवरही सुरू आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार हेही आठवड्यातून एकदा महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत टंचाईचा आढावा घेत आहेत. तालुक्याची टंचाई आढावा बैठकमहिनाभरात त्यांनीही चार ते पाच वेळा बैठका घेतल्या. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर येथे नुकतीच तालुक्याची टंचाई आढावा बैठक घेतली. कोणतीही ठोस उपाययोजना नाहीयाबरोबरच स्थानिक आमदारांकडूनही टंचाईचा आढावा घेतला जात आहे. सातत्याने आढावा घेतला जात असला तरी टंचाई परिस्थितीत टँकरव्यतिरिक्त कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.विहिरी अधिग्रहित करण्यावरच भरटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करणे आणि विहिरी अधिग्रहित करण्यावरच प्रशासनाचा भर आहे. याशिवाय जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत आतापर्यंत दोन वेळा टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.