शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

चालक विजय हाच मास्टर माइंड

By admin | Updated: June 23, 2014 00:30 IST

औरंगाबाद : सेंट झेव्हियर्स शिक्षणसंस्थेत चालक म्हणून काम करीत असलेला विजय सरोदे हाच ५२ लाख रुपये लुटीच्या कटाचा मास्टर माइंड निघाला.

औरंगाबाद : सेंट झेव्हियर्स शिक्षणसंस्थेत चालक म्हणून काम करीत असलेला विजय सरोदे हाच ५२ लाख रुपये लुटीच्या कटाचा मास्टर माइंड निघाला. तीन बायकांचा दादला असलेल्या विजयने तिन्ही घरांचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी लुटीची व्यूहरचना आखून ती फत्ते करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्याचा डाव उधळला.सेंट लॉरेन्स शाळेत व्यवस्थापक असलेले दीपक पुजारी, विजय सरोदे व कृष्णा देवडे हे तिघे जण शाळेत विविध शुल्कापोटी जमा झालेली रक्कम दोन- तीन दिवसांत एकदा मलकापूर बँकेत जमा करण्यासाठी जात असत. बँकेत भरली जाणारी भली मोठी रक्कम पाहून चालक विजय सरोदे याची नजर फिरली. विजयला तीन बायका आहेत. कारचालक म्हणून मिळणाऱ्या तुटपुंज्या वेतनातून तिन्ही घरांचा संसार चालविणे त्याला कठीण झाले होते. त्यामुळे त्याने शाळेची रक्कम पळविण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने सिडकोच्या १३ व्या योजनेतील घराशेजारी राहणाऱ्या आरकेश पगारे व सत्यवान पगारे या दोन्ही भावांना रक्कम लुटण्यासाठी तयार केले. आरकेश व सत्यवान यांनासुद्धा ही कल्पना आवडली. त्या दोघा भावांनी त्यांचे मित्र पंडित ऊर्फ दाजी कांबळे, रमेश कांबळे व विनोद साळवे या तिघा जणांना या कटात सहभागी करून घेतले. तीन दिवसांपूर्वी आरकेश, सत्यवान, रमेश, पंडित ऊर्फ दाजी व विनोद या पाच जणांनी सेंट लॉरेन्स शाळेपासून रावदेव हॉस्पिटलपर्यंत रेकी केली. शाळेतून रक्कम घेऊन निघालेली कार कुठे अडवायची. अडविण्यासाठी कारला धडक देऊन भांडणाची कुरापत कुणी काढायची. कार थांबल्यानंतर दुसऱ्या मोटारसायकलवरून तेथे कोणी पोहोचायचे, कारमधून पैशाची बॅग घेऊन कोणी पळून जायचे, अशी यथोचित व्यूहरचना आखण्यात आली. या व्यूहरचनेत विजय सरोदे या कारचालकाची भूमिका महत्त्वाची राहिली. पैसे लुटीच्या कटात विजयने शाळेचा दुसरा कर्मचारी कृष्णा देवडे यालाही पैशाचे आमिष दाखवून सहभागी करून घेतले. रावदेव हॉस्पिटलच्या पुढे काही अंतरावर कार अडवून प्लॅटिना मोटारसायकलवरून आलेल्या आरकेश व पंडित ऊर्फ दाजी कांबळे यांनी भांडणाची कुरापत काढली. कारमधून विजय सरोदे, कृष्णा देवडे व दीपक पुजारी हे तिघे जण खाली उतरले. आरकेश व पंडित यांनी सुरुवातीला विजय, त्यानंतर दीपक पुजारी व कृष्णा देवडे यांना मारहाण केली. नियोजित कटाप्रमाणे तेथे निळ्या रंगाच्या करिश्मा मोटारसायकलवरून सत्यवान, रमेश व विनोद हे तिघे जण आले. त्यांनी कारमधून ५२ लाख रुपयांची बॅग घेतली व निघून गेले. कारमध्ये पैशाची बॅग नसल्याचे कृष्णा देवडे याने दीपक पुजारीला जाऊन सांगितले.विशेष म्हणजे, ‘तो मी नव्हेच’ हे दाखविण्यासाठी आरकेश पगारे (झिपऱ्या) याने मोबाईलवरून ‘१००’ क्रमांक डायल करून येथे माझ्या मोटारसायकलला कारने धडक दिली आहे. पोलिसांना लवकर पाठवा, असा बनाव केला; पण त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक हा व्यस्त होता. पोलिसांनी आरकेश यास पकडून एमआयडीसी सिडको ठाण्यात नेले. तेथे त्याच्या मोबाईलमधून सर्व आरोपींचे मोबाईल क्रमांक घेतले. तिघा जणांना पोलीस कोठडीआरोपी आरकेश पगारे, चालक विजय सरोदे व कृष्णा देवडे या तिघा जणांना पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरे आरोपी सत्यवान पगारे, पंडित ऊर्फ दाजी कांबळे व विनोद साळवे या तिघा जणांची ओळख परेड घ्यायची असल्यामुळे पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने २६ जूनपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीकाल सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांना ही घटना समजताच त्यांनी पोलीस भरतीमध्ये कार्यरत असलेले गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, शिवा ठाकरे, गौतम पातारे यांना एमआयडीसी सिडको ठाण्यात तात्काळ रवाना केले. तेथे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव यांनी आरोपींची वैयक्तिक माहिती गोळा करून त्यांना पकडण्यासाठी विविध पथके रवाना केली. निरीक्षक पातारे यांनी आरोपींचे मोबाईल ट्रेस करून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना त्या- त्या ठिकाणांवर जाण्याच्या सूचना केल्या. यात सिडको ठाण्याचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, एमआयडीसी सिडको ठाण्याचे अशोक सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक निरीक्षक उमेश थिटे, उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सुभाष खंडागळे, गोरख चव्हाण व वाघ यांच्या पथकांनी ४ आरोपी व पैशाची बॅग हस्तगत केली.