शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांना ड्रेसकोड

By admin | Updated: January 6, 2015 13:05 IST

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील दर सोमवारी अन शुक्रवारी कर्मचार्‍यांना ड्रेसकोडमध्येच कार्यालयात यावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना यापूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी ओळखपत्र लावणे बंधनकारक केले होते. त्याचबरोबर कार्यालयात येण्याच्या अन जाण्याच्या वेळाबाबतही डॉ.परदेशी यांनी कर्मचार्‍यांना बर्‍यापैकी शिस्तीचे धडे दिले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला गती मिळाली होती. त्यात आता जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनीही कार्यालयातील कर्मचार्‍यांवर विशेष लक्ष ठेवत त्यांच्यासाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला कर्मचार्‍यांना गुलाबी रंगाची साडी तर पुरुष कर्मचार्‍यांना पर्पल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तर चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा गणवेश हा पांढर्‍या रंगाचा राहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरणार्‍या बाहेरच्या व्यक्ती सहजपणे ओळखता येवू शकणार आहेत. दर सोमवार आणि शुक्रवारी कर्मचार्‍यांना याच ड्रेसकोडमध्ये कार्यालयात यावे लागणार आहे. त्यामुळे कामात सूसुत्रता येणार आहे.