औरंगाबाद : अमृतसर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या तुषार आहेर याने भीमपराक्रम करताना पदकांचा डबल धमाका केला. त्याने एक सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. त्याच्या या दिमाखदार कामगिरीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तृतीय क्रमांक पटकावला.तैवान येथे आंतरविद्यापीठ जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार आहेर याने फॉईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर इप्पी प्रकारात त्याने रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली. तुषार आहेर याने आंतरविद्यापीठ अ.भा. तलवारबाजी स्पर्धेत गतवर्षी सुवर्णपदक जिंकणाºया चंदीगड येथील रवी शर्मा याचा १०-४ असा उपांत्यपूर्व फेरीत धुव्वा उडवला व त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत अमृत येथील गुरू नानकदेव विद्यापीठाच्या अक्षयचा १५-११ आणि अंतिम सामन्यात अमृतसर येथील गुरू नानकदेव विद्यापीठाच्या मोहंमद तारीख याला धूळ चारीत फॉईल प्रकारातील सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. विशेष म्हणजे अ. भा. आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत तुषार आहेर याचे हे सहावे मेडल ठरले. याआधी तुषारने २०१५ मध्ये पतियाळा येथील आंतरविद्यापीठ स्पर्धेत फॉईल प्रकारात कास्य पटकावले. २०१६ मध्ये चंदीगड येथील अ. भा. आंतरविद्यापीठ स्पर्धेत फॉईल आणि इप्पी या दोन्ही प्रकारांत रौप्यपदकांची कमाई केली. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये त्याने अमृतसर येथे इप्पी प्रकारात कास्यपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे गतवर्षी त्याने तैवान येथील आंतरविद्यापीठ जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या संघासोबत भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव डॉ. उदय डोंगरे हे प्रशिक्षक म्हणून गेले होते. त्यांच्यासोबत दिनेश वंजारे, राकेश खैरनार व अजय त्रिभुवन होते. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
औरंगाबादच्या तुषारचा पदकांचा डबल धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:43 IST
अमृतसर येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या तुषार आहेर याने भीमपराक्रम करताना पदकांचा डबल धमाका केला. त्याने एक सुवर्ण व एका रौप्यपदकाची कमाई केली. त्याच्या या दिमाखदार कामगिरीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तृतीय क्रमांक पटकावला.
औरंगाबादच्या तुषारचा पदकांचा डबल धमाका
ठळक मुद्देअ.भा. आंतरविद्यापीठ तलवारबाजी : सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई