शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ठिबक’चे अनुदानही पाझरले

By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST

भास्कर लांडे, हिंगोली तब्बल ३००० हजार शेतकऱ्यांना अनुदानासाठी तीन-तीन वर्ष वाट पहावी लागत आहे.

भास्कर लांडे, हिंगोलीमागील दोन वर्षांपूर्वीचेच अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसताना नव्याने तुषार आणि ठिबक संच वाटपाचे नियोजन केले. तब्बल ३००० हजार शेतकऱ्यांना अनुदानासाठी तीन-तीन वर्ष वाट पहावी लागत आहे. हा विषय बाजूला पडला असून नव्याने ५००० लाभार्थ्यांची निवड केली जाणार असल्यामुळे ठिबकप्रमाणे अनुदान पाझरण्यासारखे आहे. निव्वळ उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम कृषी विभाग करीत असून वंचितांच्या पाठपुराव्यासाठी एकाही अधिकाऱ्याला वेळ नाही. २०१२-१३ वर्षीच्या सूक्ष्मसिंचन योजनेचे गुऱ्हाळ अद्यापही संपलेले नाही. अल्पभूधारकांना एकरी २१ हजार २५८ तर बहुभूधारकांना १९ हजारांच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे धाव घेतली. योजनेच्या नियमानुसार प्रारंभी एकूण रक्कम कंपनीकडे भरली. ताबडतोब आॅनलाईन प्रस्तावही दाखल केले. पूर्वसंमतीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे फाईलही दाखल केली. त्यानंतर कृषी विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी केली. चाचपणी करून सबसिडीही जाहीर झाली. आज त्याला दोन वर्षांचा कालावधी उलटला. अजूनही अर्ध्या लाभार्थ्यांना अनुदानाची वाट पहावी लागते. विदर्भात २०१२-१३ चे अनुदान प्राप्त झाले तर २०१३-१४ चे आॅनलाईन प्रस्ताव सुरू झाले. मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुस्त अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा फटका बसत आहे. तब्बल वर्षभराच्या उशिराने अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेपासून दूर राहणे पसंत केले. आजघडीला ‘वापरा आणि फेका’ या तत्वानुसार ठिबक संच विकत घेतले जातात. एकरी २० हजारांचे अनुदान मिळत असले तरी तीन-तीन वर्षे वाट पाहण्याची वेळ नको, म्हणून शेतकरी या योजनेपासून लांबच राहणे पसंत करतात. त्यातही दिवसरात्र शेतात काम करणाऱ्या उत्पादकांना आॅनालाईन फॉर्म भरणे म्हणजे एखादे दिव्य पार केल्यासारखे वाटते. बहुतांश उत्पादकांकडे बँकेचे खातेही नसते. ठिबकाची योजना असल्याचे अनेकांना माहितीही नाही. अधिकाऱ्यांनाही कसल्याही प्रकारचे देणे, घेणे नाही. परिणामी वर्षभरापासून लाभार्थी कृषी विभागात चकरा मारीत आहेत. कृषी विभागाला एकही योजना धड राबविता येत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कोट्यावधीचा खर्च करीत असताना लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. योगायोगाने पोहोचली तरी तिचा लाभ मिळेपर्यंत मध्येच पाणी मुरते.