चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे विनापरवाना आरोग्य व्यवसाय शिबीर घेणाऱ्या डॉक्टराची औषधी जप्त केल्याची कारवाई १ सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली. नांदेड येथील डॉ. सतीश विठ्ठलराव सातोरे यांनी चारठाणा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य शिबीर घेतले. शिबिराची मान्यता प्राथमिक आरोग्य केंद्राकडून घेतली नाही. याप्रकरणी ग्रामस्थांनी चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून तक्रार केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन डॉक्टराचे ओळखपत्र, औषधी, पावत्या, रुग्णांवर उपचार केलेली कागदपत्रे यासह आदी कागदपत्रांची तपासणी केली. या प्रकरणाची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख, औषध निरीक्षक अरूण गोडसे यांना देण्यात आली. या कारवाईची चारठाणा व परिसरामध्ये चर्चा होत आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी जिल्ह्यातील १५२ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु संबंधित विभागाने थातूरमातूर कारवाई केली. त्यामुळे अनेक बोगस डॉक्टर जिल्ह्यात सर्रासपणे आपला व्यवसाय करीत आहेत.४ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबीर घ्यायचे असेल तर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. परंतु जिंतूर तालुक्यात आरोग्य शिबीर घेताना परवानगीच घेतली जात नाही. तसेच या शिबिरामधून डॉक्टर हजारो रुपयांची औषधी विक्री करून पैसे कमवित आहेत, अशा शिबिरावर आरोग्य विभागाच्या वतीने कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
डॉक्टरांची औषधी जप्त
By admin | Updated: September 2, 2014 01:53 IST