शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्ह्यातील खाणपट्टे पथकाच्या रडारवर !

By admin | Updated: May 25, 2014 01:07 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील खाणपट्टयांच्या मोजणी व तपासणीसाठी जिल्ह्यात बुधवारी पथक येणार असून या पथकामार्फत जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्यांची मोजणी करण्यात येणार आहे

उस्मानाबाद : जिल्ह्यातील खाणपट्टयांच्या मोजणी व तपासणीसाठी जिल्ह्यात बुधवारी पथक येणार असून या पथकामार्फत जिल्ह्यातील ८२ खाणपट्ट्यांची मोजणी करण्यात येणार आहे. यात काही गैरप्रकार आढळून आल्यास संबधितावर कार्यवाही व दंड ठोकणार येणार आहे. याबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाणपट्टे आहेत. ठरवून दिलेल्या निष्कर्षापेक्षा जास्त उत्खनन झाले आहे का? याचा शोध या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तसेच दिलेल्या जागेमध्ये उत्खनन केले की दुसर्‍याच ठिकाणी केले? अशा विविध बाबीचा आढावा हे पथक घेणार आहे. तपासणीदरम्यान कोणी नियंमाचे उल्लंघन केले असल्यास संबधितावर दंड लावण्यात येणार असून, प्रसंगी खनिजपट्टा रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या पथकामार्फत उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, वाशी, भूम व परंडा येथील खाणपट्ट्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनी दिली. खनिपट्टा मोजणीच्या कामी जागेच्या मोक्यावर तलाठी, मंडळ अधिकारी व खाणपट्टाधारकांना आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील खनिजपट्ट्यांची २८, २९ व ३० मे रोजी, तुळजापूर ३१ मे व १ जून, लोहारा २ जून, उमरगा ३ व ४ जून, कळंब ५ जून, वाशी व भूम ६ जून तर परंडा तालुक्यातील खनिज पट्ट्यांची ७ जून रोजी तपासणी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद, येडशी, वाघोली, उपळा, पाडोळी, वडगाव, जहागिरदारवाडी, शिंगोली, सकनेवाडी, कुमाळवाडी, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर, सिंदफळ, सावरगाव, तामलवाडी, वडगाव लाख, पिंपळा बुद्रुक, काक्रंबा, खंडाळा, रायखेल, अरबळी, टेलरनगर, नळदुर्ग, मोर्डा, बोरी, लोहारा तालुक्यातील जेवळी (रुद्रवाडी), खेड, लोहारा खुर्द, उमरगा तालुक्यातील उमरगा, कोरेगाववाडी, गुगळगाव, काळानिंबाळा, गुंजोटी, गुरुवाडी, कळंब तालुक्यातील वडगाव शि), हासेगाव (के), डिकसळ, उपळाई, रांजणी, वाशी तालुक्यातील मस्सा, पार्डी, इसरुप, भूम तालुक्यातील पाडोळी, हांडोग्री, परंडा तालुक्यातील परंडा, जामगाव, आवारपिंपरी, काटेवाडी, रोसा, कुंभेजा, अनाळा येथील खदानीची मोजणी व तपासणी संबधित पथकामार्फत करण्यात येणार आहे.