जालना : शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०१४-१५ च्या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी १४ शिक्षकांची निवड करण्यात आली असून यात ८ प्राथमिक, ५ माध्यमिक तर एका विशेष शिक्षकाचा समावेश आहे.प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक राऊत यांनी शिक्षकांची यादी जाहीर केली. यामध्ये तळेकर पृथ्वीराज त्र्यंबक (वरखेडा प्रा.शा.), गिराम गणेश जयाजी (केळीगव्हाण), साधना बजरंग परदेशी (इंदिरानगर), खोडदे सुनील जयराम (गुंज), प्रधान राजेंद्र मनोहर (आष्टी), जाधव सुभाष शिवलाल (रानमळा), जाधव सीमा यशवंतराज (निमखेडा नवा), भोंडे सुनील भागाजी (कोसगाव), जरीना बेगम म. मुसा (जालना), गवई गणेश भाऊराव (घनसावंगी), गोरे देवीदास सदाशिव (पाटोदा), इंगळे रमेश छगनराव (जाफराबाद), मोरे समाधान किसन (भोकरदन) आणि विशेष शिक्षक म्हणून राठोड सुदाम रूखला (पाटोदा) यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल उपरोक्त शिक्षकांचे सर्वत्र स्वागत होत आहे. (प्रतिनिधी)
१४ शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार
By admin | Updated: September 5, 2014 00:54 IST