जालना : जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात वेळेत उपचार मिळत नसल्याने गारेगरीब जनतेला खाजगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे सेवाच सलाईनवर आहे.जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये तुटपुंज्या सुविधांवर उपचार होत आहेत. मुख्य म्हणजे केंद्रांसाठी ८२ पदे मंजूर आहेत. पैकी २६ पदे रिक्त आहेत. याचा दूरगामी परिणामी रुग्णसेवेवर होतो आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केेंद्र प्रमुख दवाखाना असतो. आजार झाल्यास तात्काळ उपचार होतील, अशी बाभडी आशा असते. मात्र काही बोटावर मोजण्या इतके केंद्र वगळता इतर केंद्रात आलबेल कारभार आहे. कोणाचा पायपोस कोणला राहिलेला नाही. २१३ उपकेंद्रे आहेत. पैकी तेथील २०९ मंजूर आरोग्य सेवकांचे १६२ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहाय्यकांची ७ पदे रिक्त आहेत. एकूणच रिक्त पदांच्या आजारामुळे आरोग्य सेवा खिळखिळी बनली आहे. वेळेवर उपचार होईल याची शाश्वती नसल्याने रुग्णांना कर्ज काढून खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात हे वास्तव आहे. अंबड, भोकरदन येथील उपजिल्हा रुग्णालयांची परिस्थिती म्हणावी तशी नाही. रिक्तपदे व तंत्रज्ञाअभावी मशनरी शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. भोकरदन व जालना शहरात तापाची साथ वाढत आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)४० रुग्णवाहिका तत्परजिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागातंर्गत ४० रुग्णवाहिका आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका सुसज्ज असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची नितांत गरज आहे. काही ठिकाणी कुंभारझरी, तळणी, जिरडगाव येथे आरोग्य केंद्र मंजूर झालेले आहे. मात्र जागेअभावी हे काम रखडलेले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयातही अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दवाखाना चकचकीत असली तरी रुग्णसेवेसाठी डॉक्टर नसल्याने रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करावे लागत आहे.
जिल्ह्यात आरोग्य सेवा सलाईनवर
By admin | Updated: September 11, 2014 00:37 IST