शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

‘स्वाईन फ्लू’ला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क

By admin | Updated: February 5, 2015 00:54 IST

लातूर : जिल्ह्यात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली असून, सदृश स्वाईन फ्लू आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार

लातूर : जिल्ह्यात सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली असून, सदृश स्वाईन फ्लू आजाराचेही रुग्ण आढळत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेटेड वॉर्डात सध्या तीन रुग्ण संशयित असून, त्यांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. शिवाय, कालच एका रुग्णाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेऊन स्वाईन फ्लूच्या रोगाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून काय केले पाहिजे, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक व प्राचार्य यांची मंगळवारी आयएमए हॉल येथे बैठक घेण्यात आली़ याबैठकीत मुख्याध्यपक व शिक्षक यांना स्वाईन फ्लू रोगाबाबत माहिती देवून शाळा, कॉलेज यांच्या करिता शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांची महिती देण्यात आली़सर्दी, ताप खोकला असल्यास विद्यार्थ्यांना शाळत न येता घरीच विश्रांती घेण्याची सूचना देण्याबाबत व तसेच याप्रमाणे पालकांना देखील शाालेय स्तरावरुन कळविण्याबाबत सूचना देण्यात आली़ वर्गशिक्षकांनी दररोज आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांपैकी कोणाला सर्दी ताप आहे का, याची काटेकोर पाहणी करावी. तसे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांस घरी विश्रांतीचा सल्ला द्यावा. सात दिवसानंतरच त्याला शाळेत येण्यासंदर्भात सुचित करण्यात यावे, असे या बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)