शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मांजरा कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीपराव देशमुख यांची बिनविरोध निवड

By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST

लातूर : मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संचालक मंडळाने विक्रमी मतांनी विजय नोंदवला़ या संचालक मंडळाची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ प्रताप काळे

लातूर : मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत संचालक मंडळाने विक्रमी मतांनी विजय नोंदवला़ या संचालक मंडळाची विशेष सभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मधुकर गुंजकर यांच्या उपस्थितीमध्ये चेअरमनपदी आ़ दिलीपराव देशमुख यांची तर व्हॉईस चेअरमनपदी श्रीशैल्य उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ आपल्या निवडीबद्दल नूतन संचालक आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले, लोकनेते विलासराव देशमुख स्वर्गीय बी़ व्ही़ काळे यांनी ज्या उद्देशाने मांजरा साखर कारखाना उभा केला़ तो उद्देश सार्थ झाल्याचे आपण प्रत्यक्षात पहात आहोत़ विकासाचा एक टप्पा पार केल्यानंतर आता विकासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करणार असून, सध्या महाराष्ट्रात मांजरा करखाना पहिल्या पाच कारखान्यांमध्ये गणला जातो़ त्यामुळे भविष्यात कायम नंबर एक वर मांजरा कारखाना कसा विराजमान होईल, यासाठी आपले प्रयत्न असल्याचे सांगून त्यांनी संचालक मंडळाचे, सभासदांचे आभार व्यक्त केले़यावेळी मांजरा कारखान्याचे नूतन संचालक माजी राज्यमंत्री आ़ अमित देशमुख म्हणाले की, सहकार क्षेत्रात मांजरा कारखान्याने केलेली प्रगती ही लोकनेते विलासराव देशमुख, बी़व्ही़ काळे, दिलीपराव देशमुख व त्यांच्या असंख्य सहकार्यांनी केलेल्या अपार कष्टातून ही प्रगती साधता आली़ लोकनेते विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या या कारखान्यावर संचालक म्हणून आपणास काम करता येत असल्याचे समाधान असून चेअरमनपदी आ़ दिलीपराव देशमुख यांची झालेली निवड ही सार्थ निवड आहे़ त्यांच्या मार्गदर्शनात मांजरा साखर कारखान्याचे भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले़मांजरा साखर कारखान्याच्या व्हॉईस चेअरमनपदी आपली निवड केल्याबद्दल श्रीशैल्य उटगे यांनी नेत्यांचे व संचालक मंडळाचे आभार व्यक्त करून नेत्यांनी जो विश्वास आपणावर टाकला आहे, तो विश्वास प्रत्यक्षात कृतीतून काम करून सार्थ ठरविण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले़ यावेळी नूतन चेअरमन व व्हॉईस चेअरमन व मावळते चेअरमन धनंजय देशमुख, मावळते व्हॉईस चेअरमन जगदिश बावणे, कार्यकारी संचालक दत्ता शिंदे, तसेच सर्व आजी व माजी संचालकांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला़ यावेळी आ़ त्रिंबक भिसे , रेणा करखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, व्हॉईस चेअरमन सर्जेराव मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, नाथसिंह देशुख, विजय देशमुख आदींची उपस्थिती होती़