वडवळ (ना) : येथून जवळच असलेल्या खुर्दळी येथील जनमाता देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे़ आई राजा उदो उदोच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला आहे़नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची प्रचिती आहे़ नेहमी देवीच्या दर्शनासाठी भाविक - भक्तांची गर्दी असते़ सध्या नवरात्रोत्सवानिमित्त परिसरातील गावांतील आराध्यांचा कार्यक्रम होत आहे़ दररोज अभिषेक, प्रवचन, भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत़ या मंदिराच्या उजव्या बाजूस पुरुष भाविकांना तर डाव्या बाजूस महिला भाविकांना स्रान करण्यासाठी कुंड आहेत़ देवीची वेगवेगळी रुपे असलेली तीन मंदिरे येथे आहेत़ सध्या देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे़ सध्या नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याने परिसर फुलला आहे़ आईराजा उदो उदोचा जयघोष सुरु असल्याने वातावरण भक्तीमय झाले आहे़ (वार्ताहर)
जनमाता देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ
By admin | Updated: October 3, 2014 00:33 IST