उस्मानाबाद : ‘विद्यार्थी अन् गुरुजींनाही इंग्रजी येईना’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर याची दखल घेत, जिल्हा परिषद मुख्य कार्र्यकारी अधिकारी सुमन रावत यांच्या निर्देशानुसार शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी १० पथके गठित करण्यात आली आहेत. १५ डिसेंबरपासून ही पथके शाळांना अचानक भेटी देत आहेत.पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी केंद्राचे पथक जिल्ह्यात आले आहे. यावेळी संबंधित पथकाकडून गुणवत्तेची चाचपणी करण्यात आली असता, तिसरीच्या पुस्तकातील इंग्रजीचे वाक्य विद्यार्थ्यांसोबतच गुरुजींनाही बिनचूक लिहीता आले नव्हते. त्यावर ‘लोकमत’ने ‘विद्यार्थी अन् गुरुजींनाही इंग्रजी येईना’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ८ पथके गठित केली आहेत. या पथकामध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांसमवेतच विस्तार अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या नेतृत्वाखाली एकेक पथक गठित करण्यात आले आहे.दरम्यान, या पथकाने १५ डिसेंबरपासून शाळांना अचानक भेटी देण्यास सुरुवात केली आहे. पथकातील सदस्यांकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही, भौतिक सुविधा, स्वच्छतागृह, आरोग्य तपासणी याही बाबींची पाहणी केली जात आहे. ही मोहीम २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर ही पथके २२ डिसेंबर रोजी मुुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर ज्या शाळांची परिस्थिती चिंताजनक असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)४पथकांकडून शाळा तपासणीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर त्याची पॉवरपॉर्ईंट प्रझेंटेशन केले जाणार आहे. ज्या शाळांची गुणवत्ता चांगली असेल त्यांचे कौतुक तर चिंताजनक परिस्थिती असलेल्या शाळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.विस्तार अधिकारीही लागले कामाला४केंद्रीय पथकाकडून केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या अपेक्षित शाळा भेटी नसल्याचे निरीक्षण नोंदविले होते. याबाबतही ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर सीईओंंनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. प्रत्येकांनी जास्तीत जास्त शाळा भेटी कराव्यात, असे निर्देश देतानाच जे कुचराई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली आहे.
गुणवत्ता तपासणीसाठी दहा पथके तैनात
By admin | Updated: December 18, 2014 00:36 IST