वाशी : टेम्पोचा जोरदार धक्का लागल्याने रोहयोच्या कामावर मजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला़ हा अपघात सोमवारी दुपारी सोन्नेवाडी (ता़भूम) शिवारात घडला असून, या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़पोलिसांनी सांगितले की, सोन्नेवाडी गावानजिक औरंगाबाद-सोलापूर महामार्ग ते ईट रस्त्यावर सामाजिक वनिकरणामाफर् त वृक्षलागवडीचे काम सुरू आहे़ रोहयोच्या या कामावर गिरवली येथील शामलबाई श्रीपती गायकवाड (४०) ही महिला सोमवारी काम करीत होती़ रोडलगतच्या खड्डयातून वृक्षलागवड करून रस्त्यावर येत शामलबाई गायकवाड यांना रोपटे घेऊन आलेल्या टेम्पो (क्रमांक एम.एच.- १६- ए.ई़७९१४) मागे घेताना जोरदार धक्का बसला़ जखमी शामलबाई गायकवाड यांना वाशी येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. बोराडे यांनी मृत घोषीत केले़ याबाबत डॉ़ बोराडे यांनी दिलेल्या माहितीवरून वाशी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास ईट दूरक्षेत्राचे जमादार भालेराव,पवार हे करीत आहेत़ (वार्ताहर)
मजूर महिलेचा अपघातात मृत्यू
By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST