शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

‘डीसीसी’च्या एमडींना ठेवीदारांचा घेराओ !

By admin | Updated: May 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद : ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़

उस्मानाबाद : कुणाच्या मुला-मुलीचे लग्ऩ़़ कुणाच्या आई-वडिलांचा दवाखाना तर कुणाच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अशा एक ना अनेक कामासाठी पैसे मिळवेत म्हणून ठेवीदार डीसीसीच्या मुख्य शाखेत दररोज चकरा मारत आहेत़ ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़ पैसे द्या, अन्यथा बँकेला कुलूप ठोकू, अशी भूमिका उपस्थित काही महिलांनी घेतली होती़रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप, कर्ज वसुलीची न्यायप्रविष्ठ प्रकरणे अशा अनेक कारणांनी जिल्हा बँकेची आर्थिक घडी कोलमडली आहे़ दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि पीकविम्यातील रक्कम कर्जात कपात करू नयेत, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत़ दुसरीकडे कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली आहेत़ असे असले तरी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ठेवीदारांचे आजही जिल्हा बँकेकडे ४४० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत़ यात शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचा समावेश असून, अनेकांनी भविष्यातील प्रश्नांना सोडविण्यासाठी पै-पै करून जिल्हा बँकेत ठेवी ठेवल्या आहेत़ कोणाच्या ५० हजार तर कोणाच्या १० लाखापर्यंत ठेवी आहेत़ यापेक्षा अधिक ठेवी असलेल्या बड्या ठेवीदारांची संख्याही मोठी आहे़गत रबी हंगामातील पीक विम्याची रक्कम सध्या जिल्हा बँकेत आली आहे़ ही रक्कम आल्यानंतर प्रारंभी शासनाने कर्ज खात्यात काही रक्कम कपात करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार डीसीसीने जवळपास पाच कोटी रूपयांची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेतली होती़ सर्वस्तरातून होणारा विरोध पाहता शासनाने पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेऊन नये, अशा सूचना दिल्या़ त्यानंतर कपात केलेली रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग करावी, यासाठी आंदोलने करण्यात आली़ त्यानंतर बँकेने कपात केलेल्या रक्कमेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले़जिल्ह्यातील अनेक ठेवीदार शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा बँकेत पैसे मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत़ मंगळवारी सकाळीच महिलांसह वयोवृध्द ठेवीदारांनी चक्कम कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांच्या कक्षात प्रवेश करून घेराओ घातला़ मुला-मुलींचे लग्न, शैक्षणिक काम, दवाखान्याचा खर्च अशा एक ना अनेक प्रश्न सांगून येणारा प्रत्येक ठेवीदार पैशाची मागणी करीत होता़ अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांनी समाधान होत नसल्याने उपस्थित काही महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट बँकेलाच टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता़ भूम तालुक्यातील गोलेगाव येथील लंका डोके, जळकोट तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सलीमा शेख, अकुबाई (पा़) येथील शांता कसबे, अंबेजवळगा येथील अब्दुल शेख यांच्यासह इतर ठेवीदारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी झालेल्या चर्चेनंतर घोणसे-पाटील यांनी लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेवीदार तेथून निघून गेले़(प्रतिनिधी)