जालना : शहरातील नुतन वसाहत परिसरात झालेल्या एका चोरी प्रकरणात आरोपीविरूद्ध बलात्कारासह अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या भागात ३१ मार्च रोजी एका घरातून संगणक चोरीस गेल्याप्रकरणी संशयित सुरज सरदारसिंग चव्हाण (रा. दरेगाव) याच्याविरूद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विभूते व त्यांचे सहकारी तपास करीत होते. दरम्यान, याच प्रकरणात फिर्याद मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव येत असल्याने फिर्यादीसह तीन जणांनी विष प्राशन केल्याचा आरोप फिर्यादीच्या नातेवाईकांनी केला होता. या घटनेमुळे विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांनी तातडीने जालन्यात दाखल होऊन तिनही रुग्णांची भेट घेतली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक सुरेश भाले, विशेष कृती दलाचे विनोद इज्जत पवार, पो.नि. अनिल विभूते यांनी तपासाची चक्रे फिरवत प्रकरणाचा छडा लावला. यात संशयित सुरज याने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यासह नातेवाईकांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे रविवारी पो.कॉ. किशोर एडके यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात सुरज चव्हाणविरूद्ध फिर्याद दिली. पीडित मुलगी व विष प्राशन केलेल्या नातेवाईकांचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकरी तेजस्वी सातपुते या करीत आहेत. (प्रतिनिधी)
चोरी प्रकरणात युवकावर बलात्काराचाही गुन्हा
By admin | Updated: April 7, 2015 01:20 IST