शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

आठ जणांविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा

By admin | Updated: September 13, 2014 23:46 IST

नवीन नांदेड : मोटारसायकल न दिल्याचा राग मनात ठेवून अनुसूचित जातीमधील २३ वर्षीय तरूणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन नांदेड : मोटारसायकल न दिल्याचा राग मनात ठेवून अनुसूचित जातीमधील २३ वर्षीय तरूणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून नांदेड ग्रामीण ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील सुधाकर लिंगायत (रा. पावडेवाडी ता. नांदेड) असे फिर्यादीचे नाव आहे. सुनील लिंगायत हे पिंपळगाव पुंड येथे मामाच्या गावी गेले होते. यावेळी पंढरी डक याने दुचाकी मागितली, ती न दिल्याने आरोपी पापाराव दशरथ डक, शंकर विश्वनाथ डक, ज्ञानेश्वर संतुकराव डक, राजू रमेशराव डक, चांदू व्यंकटी डक, हनुमंत दशरथ डक, बंडू मधुकर पुंड व पंढरी नागोराव डक या आठ आरोपींनी ८ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लिंगायत यांच्या मामाच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमविली. यावेळी त्यांनी सुनील लिंगायत यांना जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप आहे. लिंगायत यांनी आरडाओरड केल्यानंतर भांडण सोडविण्याकरीता त्यांची मामी कोंडाबाई जोगदंड आणि अन्य साक्षीदार आले असता, आरोंपीेनी त्यांना शिवीगाळ करून जीेवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय मामी कोंडाबाई जोगदंड यांनासुद्धा मारहाण केली. याप्रकरणी लिंगायत यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून सहा. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख तपास करीत आहेत.(वार्ताहर)