हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे रिसोड रस्त्यावर वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या दुचाकीस धडक देऊन दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी सेनगाव ते रिसोड जाणाऱ्या राज्य रस्ता क्रमांक २०६ वर एकनाथ विश्वनाथ मुकीर (रा. सावरखेडा, ता.सेनगाव) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम. एच. ३८- ४८२४ ही भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून समोरून येणाऱ्या अमजदखाँ यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात अमजदखाँ व त्यांच्यासोबतचे रेहान खाँ, आयान खाँ, साईना हे गंभीर जखमी झाले. यातील आयान खाँ, अमजद खाँ हे जागीच मरण पावले. यात दोघांच्या मरणास कारणीभूत ठरून एकनाथ मुकीर हा स्वत: जखमी होऊन मरण पावला, अशी फिर्याद मो. मोहसीन मो. कुरेशी (२८, रा. चिंचबा, ता. रिसोड) यांनी पोलिसांत दिली. त्यावरून सेनगाव पोलीस ठाण्यात मयत दुचाकीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)
दुचाकीस्वारावर गुन्हा
By admin | Updated: October 7, 2014 00:13 IST