कोरोनाची दुसरी लाट सुसाट वेगाने ग्रामीण भागात पसरली असून, तिला रोखण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. मात्र, ग्रामीण भागात अनेकांना याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते. अनेक नागरिक विनामास्क घराबाहेर फिरताना दिसत आहेत. समजावून सांगूनही ऐकत नसल्याने शेवटी पोलीस व आरोग्य विभागाने पाचोड बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करणे सुरू केले. यामुळे झंझट नको म्हणून नागरिकांची पळापळ झाली. काही वेळातच पाचोडमधील गल्ल्याही सुनसान दिसून आल्या. ही कारवाई सपोनि. गणेश सुरवसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर व त्यांच्या आरोग्य पथकाने केली.
फोटो : विनाकारण फिरणारांवर पाचोडमध्ये कारवाई करताना पोलीस व आरोग्य विभागाचे पथक.
120521\anil mehetre_img-20210512-wa0022_1.jpg
विनाकारण फिरणारांवर पाचोडमध्ये कारवाई करताना पोलीस व आरोग्य विभागाचे पथक.