औरंगाबाद : आजच्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जीवनात भौतिकतेच्या हव्यासापायी बरीच कुटुंबे मनस्वास्थ्य हरवून बसली आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वाधिक उपेक्षा व दुर्लक्ष होत आहे ते मुलांकडे. पालक आणि पाल्य यातील सशक्त दुवा म्हणजे सुसंवाद; पण त्याची जागा घेत आहे विसंवाद. हा विसंवाद पालकांना अगदी सोप्या भाषेत अंजली तापडिया यांनी लक्षात आणू दिला. पालक -पाल्यांतील होणारा विसंवाद हा सुसंवाद कसा होऊ शकतो याकडे सुजाण पालकांचे लक्ष त्यांनी वेधले. अंजली तापडिया या प्रसिद्ध समुपदेशक व सेफ पॅक इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत. निमित्त होते लोकमत सखी मंचने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘उमलती मुले, सुगंधित फुले’ या व्याख्यानाचे.बालकांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक असा अष्टपैलू विकास व्हावा, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी नेमके काय करायला हवे. मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा यासाठी गरोदरपणात आईने काय काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे मुलांचा आहार, त्यांचा भाषा विकास, पंचेंद्रियावरचे संस्कार, खेळाचे महत्त्व, निरीक्षणशक्ती, निर्णयक्षमता, जिज्ञासूवृत्ती, व्यवहारज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, वाचन संस्कृतीची जोपासना आदींवर अंजली तापडिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. चित्रफितीद्वारे अगदी हसत खेळत त्यांनी पालकांना मंत्रमुग्ध केले. घरातील गंभीर वातावरणात मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो, तर आनंदी वातावरणात मुलांमध्ये आत्मसन्मानाची भावना निर्माण होते, असे तापडिया म्हणाल्या. मनाची प्रसन्नता, संस्कार ही जीवनातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे व त्याचा वारसा पालकांनी मुलांना द्यायला हवा. शिस्त, स्वावलंबन, अनुशासन याचे महत्त्व व आवश्यकता मुलांच्या भावी जीवनात किती गरजेची आहे हे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगून स्पष्ट केले. इतरांशी तुलना न करता त्याच्यातील सुप्तगुण बरोबर ओळखणे हे किती महत्त्वाचे आहे हेही त्यांनी स्वत:च्या मुलाच्या उदाहरणावरून सांगितले. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, स्पर्धेच्या जगात मुलांनी पुढे असावे, त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी अनेक गोष्टींचे त्यांनी सहज, सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. दृकश्राव्य पद्धतीने झालेल्या या व्याख्यानास पालकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.लकी ड्रॉच्या विजेत्या सखीया व्याख्यानादरम्यान सखी मंचच्या मेंबरशीपच्या वेळेस जाहीर करण्यात आलेले लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यांची नावे अशी- ज्योती इंटरप्राईजेस (सोफा सेट)अर्चना प्रवीण रोडे सानिया डिस्ट्रिब्युटर्स (मायक्रोवेव्ह)प्रतिभा किशोर शेवाळे, निर्मला अशोक भुतडा, मेघा नितीन वीरफिल्ट्रॉनिक्स सिस्टीम्स (वॉटर प्युरिफायर)- मीरा संभाजी जालन, संगीता प्रवीण देशमुख, आशा सोनवणे, शालिनी पुजारीतानी वेअर्स (गिफ्ट व्हाऊचर्स)पल्लवी सुनील ढवळे, लक्ष्मी उमेश भारती, राधिका नि. बनारसे, संगीता कदम, मंजू कापसे ग्राविटी शॉप(क्रॉकरी, पर्स, ज्वेलरी) संगीता रामचंदानी, शालिनी खरातरेखा जाधव, कल्पना संजय खुडे, संध्या दीपक पवार, जागृती के. परेळ,अनिता गोसावी, मीरा संतोष जाधव, रंजना हुंडीवालेवर्ल्ड आॅफ टायटन (रिस्ट वॉचेस)भारती संभाजी भोसले, राणी सचिन कापकर, अनघा अनंत जवळेकर, शारदा सुभाष शिंदे, सुनीता विश्वास पवारजोशी बंधू (मोत्यांचे सेट)भारती सोनवणे, देवयानी सागर चव्हाण, प्रज्ञा देशमुख, ज्योती बैरागी, हेमलता ढवळे, कुंदलता चरमळ, शुभांगी प्रदीप शिरसाट, नलिनी कृष्णराव रोडे, अर्चना नागेश ओतरी, शीतल नितीन माळेगावकरटीप : विजेत्यांनी गिफ्टसाठी लोकमत भवनमधून दि. २७ व २८ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान पत्र प्राप्त करावे.
पाल्यांशी संवाद तुटू नये
By admin | Updated: June 27, 2014 01:03 IST