जालना : ब्राह्मण समाजाने समाजासह इतर समाजाच्याही विकासात योगदान दिले पाहिजे, असे मत माजीमंत्री शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले.बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या दीपावली स्नेहमिलन व सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबन लोणीकर, आ. नारायण कुचे, प.पू.शेष महाराज गोंदीकर, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश त्रिपाठी, ज्योतिषरत्न प्रिती कुलकर्णी, माजी आ. अरविंद चव्हाण, सीमा खोतकर, अॅड.बळवंत नाईक, आर. आर. खडके, ज्ञानदेव पायगव्हाणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर प्रदेशाध्यक्ष प्रा. श्रीकांत देशपांडे हे अध्यक्षस्थानी होते. रुख्मीणी गार्डनच्या मैदानावर आयोजित केलेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी फडणवीस यांनी समाजात चांगले संस्कार झाले पाहिजेत. नवी पिढी संस्कारक्षम असली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे व शहराध्यक्ष किशोर शर्मा यांनी आयोजन केले होते. यावेळी सुधाकर लोखंडे, अॅड.केशव नाईक, डॉ. वसंत चौकुले, प्रा. वसंत देव, विजय देशपांडे, अरुण नंद, रघुवीर अवचार, संजय कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, ज्योती जोशी, छाया भाले, सुनंदा बदनापूरकर, विद्या कुलकर्णी, नगरसेविका वंदना कुलकर्णी, विजया नंद, छाया नाईक, प्रिती कुलकर्णी, मंजू शुक्ला आदी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी एस. व्ही. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले, आर. आर. जोशी यांनी सूत्रसंचलन तर किशोर शर्मा यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सर्व समाजाच्या विकासात योगदान द्या-फडणवीस
By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST