शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

करार शेती आली कांदा उत्पादकांच्या मदतीला धावून

By admin | Updated: March 22, 2017 00:32 IST

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे.

विशाल सोनटक्के उस्मानाबादसद्यस्थितीत कांद्याचा भाव ५ ते ६ रुपये किलो असा आहे. पडलेल्या भावामुळे राज्यभरातल्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शासनाने पिकांना हमीभाव देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र सध्या कांद्याचे भाव पडलेले असतानाही जिल्ह्यातील ४३ एकरवरील शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रम व करार शेतीमुळे हमी भावानुसार रक्कम मिळणार आहे. साधारणपणे मार्च महिन्यात शेतकरी आपला उत्पादीत झालेला कांदा बाजार समितीत आणतो. या काळात एकाच वेळी मोठी आवक होत असल्याने व्यापारी संगनमत करुन कांद्याचे भाव पाडतात. आणि कवडीमोल भावाने कांद्याची खरेदी करतात. शेतकऱ्यांकडील कांदा संपला की, मग बाजारपेठेत कांद्याची कृत्रीम टंचाई निर्माण केली जाते आणि त्यानंतर जुलै, आॅगस्टमध्ये कांद्याचे भाव वधारायला लागतात. एकदा भाव कडाडले की, चाळीत साठवलेला कांदा व्यापारी बाहेर काढून भरभक्कम नफा कमवितात. या दुष्ट चक्रामुळेच कांदा उत्पादक शेतकरी कायम अडचणीत सापडल्याचे दिसून येते. यावर मात करण्यासाठी तुळजापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने गटशेती, करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळविण्याचा अभिनव मार्ग शेतकऱ्यांना दाखविला आहे. याचा जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांना यंदा फायदा होणार आहे. या केंद्राने कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना या करार शेती उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कळंब तालुक्यातील गौर येथील भैरवनाथ किसान प्रोड्युसर कंपनी, तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कृषी परिवर्तन कांदा उत्पादक कंपनी व उस्मानाबाद तालुक्यातील आंबेवाडी येथील कृषी उन्नती कंपनीमधील सदस्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ गणेश मंडलिक यांनी वरीष्ठ शास्त्रज्ञ सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शेतकरी गटांचे फळ निर्र्यातदार, सिडस् कंपनी, व्यापाऱ्यांसह सेंद्रीय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थांशी करार केले. राष्ट्रीय उद्यान विद्या संशोधन आणि विकास प्रतिष्ठान नाशिक तसेच कांदा व लसूण संशोधन निदर्शनालय राजगुरुनगर यांच्याशी ४३ कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे करार करण्यात आले. आणि या ४३ शेतकऱ्यांच्या ४३ एकरावरील क्षेत्रात कांदा बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. सद्यस्थितीत बाजारपेठेत ५०० ते ६०० रुपये क्विंटलने कांदा घेतला जात असताना या शेतकऱ्यांना मात्र कराराप्रमाणे प्रति क्विंटल २५ ते ५० हजार या दराने बियाणांचा हमीभाव मिळणार आहे. त्यामुळेच कांद्याचे दर कमालीचे पडलेले असतानाही केवळ गट व करार शेतीमुळे हे शेतकरी निर्धास्त असल्याचे दिसून आले.