औरंगाबाद : दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आक्रमक व्हायचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे रविवारी येथील तापडिया कासलीवाल मैदानावर सकाळी १० वा. विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. आ. अब्दुल सत्तार संयोजक असलेल्या या परिषदेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. अशोक चव्हाण, खा. राजीव सातव, पक्षाचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, रजनीताई पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, आ. अमित देशमुख, आ. बस्वराज पाटील, आ. अमर राजूरकर, आ. सुभाष झांबड, आ. संतोष टारपे, वसंतराव चव्हाण, डी.बी. सावंत, अमिता चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेमध्ये मराठवाड्यातील पक्षाचे खासदार, आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, जि.प. सदस्य, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित राहतील, असे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी कळविले आहे.
काँग्रेसची आज दुष्काळी परिषद
By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST