२२ फेब्रुवारी २०२१ रोजी कोकणवाडी चौक येथे भीमराव दिलीप घुसळे आणि ललित विजय जाधव या दोन मित्रांमध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला होता. रागाच्या भरात ललितने भीमरावला ढकलल्याने भिंतीवर डोके आदळून त्याचा मृत्यू झाला होता. आपण ढकलल्याने मित्राचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर ललित स्वतःहून वेदांतनगर पोलीस ठाण्यात हजर झाला व घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यावरून पोलिसांनी ललितला अटक करून त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी ललित जाधव याने ॲड. कार्तिक आर. शर्मा यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.
सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात आरोपीस सशर्त जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST