शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

खाजगी टँकर्सना नोंदणी सक्तीची

By admin | Updated: July 9, 2014 00:48 IST

विकास राऊत , औरंगाबाद शहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या खाजगी टँकर्सने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.

विकास राऊत , औरंगाबादशहरातील बहुतांश भागांमध्ये सध्या खाजगी टँकर्सने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. ते पाणी नाल्यातून पुरविले जात असल्याचे वृत्त लोकमतने ८ जुलैच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर पालिकेसह अन्न व औषधी प्रशासन जागे झाले आहे. पालिकेने खाजगी टँकर्सला सक्तीने नोंदणी करण्याचे ठरविले आहे. पाणी कुठून आणले जाते. पाणी पुरविणाऱ्या मालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकाची माहिती आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, याची माहिती खाजगी टँकरचालकांना पालिकेला द्यावी लागणार आहे. दोन दिवसांत त्यासंबंधीचे प्रगटन पालिका प्रसिद्धीस देणार आहे. शहरात नाल्यालगत असलेल्या विहिरीतून टँकर भरून ते विकले जातात. ते पाणी पिण्यासाठी वापरले जाते की, बांधकामासाठी, याबाबत काहीही स्पष्टीकरण पुढे येत नाही. हॉटेलचालकांना खाजगी टँकरचालकांकडूनच पाणी घ्यावे लागते.मनपा आयुक्त म्हणाले...मनपाकडे खाजगी टँकरचालकांची नोंदणी सक्तीची केली जाईल. कारण नाल्यातील पाणी इतर वापरासाठी दिले जात असेल तर काहीही हरकत नाही. मात्र, ते पिण्यासाठी विकले जात असेल तर शहराचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. नाल्याकाठचे पाणी टँकरमध्ये भरण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोकादेखील होऊ शकतो. पाण्याचे स्रोत मनपाला कळवा. यासाठी नोंदणी सक्तीची केली जाईल. नोंदणीसाठी शुल्क आकारण्याचा काहीही मुद्दा नाही. जर टँकरचालकांनी नोंदणी केली नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी दिला. नागरिकांनी हे करावे...शहरात मनपाकडून पाणीपुरवठा न झाल्यास नागरिक खाजगी टँकर्सकडे धाव घेतात. त्यामुळे नागरिकांनी टँकरचे पाणी घेण्यापूर्वी चालकांकडे पाणी कुठून आले. विहिरीचा पत्ता कुठे आहे. नाल्यालगत विहीर आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी म्हणून खाजगी टँकरचालक दूषित पाणीपुरवठा कमाईमुळे करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्यास घातक पाण्याचे अड्डे! जवाहर कॉलनी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच नाल्यातील विहिरीतून पाणी उपसून खाजगी टँकर्सला विकले जाते. शहरात सुमारे ७०९ च्या आसपास टँकर आहेत. संजय गांधी मार्केट हडको परिसरात नाल्यापासून हाकेच्या अंतरावर विहिरी आहेत. त्यातील पाणीही खाजगी टँकरचालकांना विकले जाते. जटवाडा परिसर, खाम नदीतील पाणीदेखील उपसून टँकरचालकांना देण्यात येते. टँकरवर पिण्याचे पाणी म्हणून असे लिहिलेले असते, हे विशेष. सरकारी टँकर शुद्ध पाण्याचेमनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुष्काळसदृश स्थितीत पुरविण्यात येणारे टँकर्स हे शुद्ध पाण्याचे आहेत. मनपाचे ५८ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे ६१४ टँकर्स सध्या शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवीत आहेत. मनपाची फारोळा येथे जलगुणवत्ता तपासणीची प्रयोगशाळा आहे. तेथे पाण्याचे टीडीएस कमी केले जाते. पिण्याचे पाणी म्हणून विकल्या जाणाऱ्या खाजगी टँकरला कुणाचे लायसेन्स असावे. असा मुद्दा पुढे आला आहे.मनपाने लोकमतच्या वृत्तानंतर नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्न व औषधी प्रशासन याबाबत टोलवाटोलवी करीत आहे. बाटलीबंद पाण्याच्या विक्रीसाठी औषधी प्रशासनाचा परवाना लागतो. मग टँकरची नोंदणी व लायसेन्स देण्यासाठी प्रशासन गाफील का राहिले, असा प्रश्न आहे. २०११ पासून शासनाच्या आदेशानुसार मनपाकडून कोणतीही अन्न व औषधीशी निगडित परवानगी मिळत नाही. तीन वर्षांपासून एफडीएकडून परवानगी मिळते. पाणी हा जीवनावश्यक घटक आहे. दूषित पाण्यामुळे अनेक आजार होतात. दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचालकांवर मनपाने गुन्हे दाखल करावेत, असे सांगून एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. लायसेन्सची जबाबदारी आमच्याकडे नाही औरंगाबाद : अन्न व औषध प्रशासनाकडून फक्त मिनरल वॉटर, पॅकबंद पाण्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र, पाण्याच्या टँकरला परवानगी देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मुळात विहिरीतील पाणी विकण्याची कायद्याने परवानगी नाहीच. गटारातील पाण्याचा पुरवठा नागरिकांना करणाऱ्या खाजगी टँकरचालकांवर गुन्हे दाखल करावेत, असे मत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी व्यक्त केले. अन्नसुरक्षा मानक २००६ नुसार नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी कायद्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोणत्याही पाण्याचे शुद्धीकरण करूनच ते नागरिकांना द्यावे, तसेच विहिरीचे पाणी विकता येत नाही, असा कायदा आहे. मात्र, विहीरमालक पाण्याची कोणतीही तपासणी न करता अवैधरीत्या पाणी विकत असतील तर तो गुन्हा आहे. तसेच खाजगी टँकरद्वारे असा अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असेल तर तो ३२८ नुसार गुन्हा आहे. नागरिकांच्या जीवितास हानी पोहोचविणाऱ्या या टँकरचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मनपाने टँकरची दर महिन्याला तपासणी करावी. टँकरला आतून गंज चढलेला आहे का, याचीही दक्षता घ्यावी.