शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पडद्याआड धामधूम

By admin | Updated: November 23, 2014 00:22 IST

गजानन वानखडे , जालना जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांसह गृहनिर्माण, पाणी वाटप व उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सहकार खात्याने जाहीर

गजानन वानखडे , जालना जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांसह गृहनिर्माण, पाणी वाटप व उपसा जलसिंचन सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सहकार खात्याने जाहीर केल्यापाठोपाठ त्या निवडणुकांना उधाण आले खरे; परंतु, पडद्याआड फारसा गाजावाजाविना या निवडणुकांचा सोपस्कार पार पाडल्या जात आहे. सहकारी विभागाने दिलेल्या आदेशांप्रमाणे ३० नोव्हेंबरपूर्वी या सर्व ड वर्गातील २६८ सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या जिल्ह्यातील सोसायट्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. १ नोव्हेंबरपासून या सोसायट्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सहकार खात्याने अ,ब, क, ड असे वर्गीकरण करून पहिल्या टप्यातील ड वर्गात मोडणाऱ्या सहकारी संस्थेच्या निवडणुकेच्या प्रक्रियेला १ नोव्हेंबर पासून सुरवात केली. प्रत्यक्षात १९ नोंव्हेबरला निवडणुकीला प्रारंभ झाला. शासनाच्या आदेशाप्रमाणे ११ सप्टेबरपासून जिल्हातील सोयाट्यांचे टप्याटप्यांने निवडणुका घेण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्याप्रमाणे पहिल्यांदा ड वर्गात मोडणाऱ्या सोसायट्यांच्या निवडणुका होत आहे. ह्या निवडणुका ३० नोंव्हेबर आधी पूर्ण करून राहिलेल्या वर्गाची निवडणुक घेण्यात होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक खरात यांनी दिली. ड वर्गात मोडणाऱ्या संस्थेचे प्रकार ज्या सोसायट्यांचे सभासद संख्या दोनशेपेक्षा कमी आहे, अशी गृहनिर्माण संस्था , दोनशेपेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी उपसा जलसिंचन आणि सहकारी पाणी वापर संस्था, सर्व मजूर / जंगल कामगार सहकारी संस्था व इतर सर्व साधारण सहकारी संस्था ह्या ड वर्गात मोडत असून सध्या याची निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीत सर्वच सभासदांनी आपले नाव यादीत आहे किंवा नाही याची सर्व सभासदांनी खात्री करून घ्यावी आणि आपले नाव असल्यास सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. ज्या सभासदाकडे मागील थकबाकी आहे त्यांनी तात्काळ भरावे अन्यथा मतदानाच्या यादीतील आपले नाव कमी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अशोक खरात यांनी दिली आहे. दरम्यान, या जिल्ह्यात या निवडणुकांच्या हालचाली सुरु असल्या तरी त्याचा फारसा गाजावाजा होत नसल्याने निवडणुका होताहेत की नाही, हेच कळेनासे झाले आहे. या निवडणुकांमध्ये निव्वळ फार्स ठरतो आहे. जालना तालुक्यातील एकूण १०५ मजूर, गृहनिर्माण, पाणीवापर व उपसा जलसिंचन सोसायट्यांच्या या कार्यक्रमानुसार निवडणुका होत आहेत. ४बदनापूर तालुक्यातील २७ सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. तर अंबड तालुक्यातील २२ संस्थांच्या निवडणुका होत आहेत. घनसावंगीतील ८ मजूर संस्था तर परतूरमधील १९ संस्था, मंठा तालुक्यातील ७, जाफ्राबाद तालुक्यातील २७ व भोकरदन तालुक्यातील जवळपास ३० सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यातील ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या संस्थांच्या निवडणुकीसाठी काही सेवानिवृत्त कर्मचारी, व्यवस्थापक तसेच वकीलांसह गटसचिव वगैरेंच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली या निवडणुका सुरळीत व्हाव्यात म्हणून सहकार खात्याने प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे एका-एका व्यक्तिकडे किमान डझनभर सोसायट्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.