बोरी : येथील महावितरणचा कारभार विस्कळीत झालेला असल्याने ग्राहक वैतागले आहेत. केवळ दोन लाईनमनवर कारभार चालतो. बोरी हे जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी ३३ के. व्ही. उपकेंद्राला सहा महिन्यांपासून अभियंता नाही. तसेच काही पदे देखील रिक्त आहेत. बोरी गावाची लोकसंख्या २० हजार असून सहा हजारांवर ग्राहक आहेत. परंतु तेवढ्या ग्राहकांसाठी केवळ दोनच लाईनमन काम पाहतात. वादळी वाऱ्यामुळे नेहमी वीज पुरवठा खंडित होतो. पूर्वी या ठिकाणी दहा लाईनमन होते. परंतु या सर्व लाईनमनचा कारभार दोघांनाच सांभाळावा लागत आहे. त्यामुळे काही तांत्रिक बिघाड झाला तर दुरुस्तीसाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. चांदज फिडर नादुरुस्त असल्याने बोरी फिडरमधून वीज पुरवठा केला जात आहे. परिणामी बोरीचा वीज पुरवठा विस्कळीत होत आहे. या ठिकाणी पाच लाईमन द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीने अनेक वेळा केली परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. (वार्ताहर)बिलाचे वाटप बंदबोरी आणि कौसडी येथील ८ हजार ग्राहकांना सहा महिन्यांपासून बिलांचे वाटप बंद झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. ३३ केव्ही अंतर्गत गावामध्ये लाईनमनची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे़ त्यामुळे एखाद्या ठिकाणी बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो़
महावितरण कंपनीच्या कारभाराला वैतागले ग्राहक
By admin | Updated: June 23, 2014 00:19 IST