शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

स्वच्छता मोहीम; शहरात ५० टन कचरा हटवला

By admin | Updated: December 12, 2014 00:52 IST

जालना : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नगरपालिका व स्व. रामभाऊ राऊत पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी शहरातील स्वच्छता झोन क्रमांक १ सदर बाजार भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

जालना : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नगरपालिका व स्व. रामभाऊ राऊत पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी शहरातील स्वच्छता झोन क्रमांक १ सदर बाजार भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ५० टन कचरा वाहून नेण्यात आला.या मोहिमेमध्ये एकूण १८ जवान, १२ वाहनचालक, १०९ पुरूष तर १०१ महिला कामगार तसेच २५ खाजगी कामगार अशा २६५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नगरपरिषदेचे १ ट्रॅक्टर, ६ घंटागाडी, १ कॅम्पॅक्टर, १ मिनीडोअर व १२ खाजगी ट्रॅक्टरचा समावेश होता. या वाहनांमधून ५० टन कचरा सारवाडी रोडवरील डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यात आला. या मोहिमेत माजी खासदार अंकुशराव टोपे, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपाध्यक्ष शाह आलमखान, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, बबलू चौधरी, पद्मा भरतिया, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपजिल्हाधिकारी डॉ. एस.एन. शेळके, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, सभापती नंदकिशोर जांगडे, विजय पांगारकर, संतोष माधोले, जि.प. सदस्य रवि राऊत यांनी सहभाग घेतला. यावेळी उपमुख्याधिकारी का.क़ मुखेडकर, अभियंता अग्रवाल, कार्यालयीन अधीक्षक केशव कानपुडे, अभियंता साळवे, सऊद, विभागप्रमुख डी.टी. पाटील, स्वच्छता निरीक्षक पंडित पवार, संजय खर्डेकर, राजू मोरे, कारभारी तायडे, अशोक लोंढे, शामसन कसबे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, नगराध्यक्षा यांचे मार्गदर्शन लाभल्याने वरील भागात मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम यापुढेही अन्य भागात राबविण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी मनोहरे यांनी दिली. पुतळ्याचे लोकार्पणस्वातंत्र्यसेनानी स्व. रामभाऊ राऊत यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभिकरण लोकार्पण माजी खा. अंकुशराव टोपे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.प्रास्ताविक रामभाऊ राऊत पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी केले. यावेळी अंकुशराव राऊत, वामनराव राऊत, विजय राऊत, सागर देवकर, सुरेश राऊत, अमोल राऊत, सतीश जाधव, विलास राऊत, जितेंद्र डुरे, रूपेश राऊत, ओम राऊत, सुधीर राऊत, अनिल राऊत, राजू जगताप, बाबूलाल पंडित, विश्वासराव भवर, संतोष गाजरे, मनोहर जाधव, सुरेश गाजरे, प्रकाश जगताप, गोविंद गाजरे, डिगंबरराव पेरे, रितेश मंत्री, राजेंद्र आडेप, रमेश पटेल, काशीनाथ साळवे, संजय देठे, अनंता शेळके, दीपक कोल्हे, इसाखान पठाण, गणेश भोसले, शाम लोया, रोशन चौधरी, सतीश बाभळे आदी होते. ४सदर बाजार भाग १ मध्ये ५४ कर्मचाऱ्यांनी लोहार मोहल्ला, राऊतनगर, संग्रामनगर, बसस्टँड परिसर येथील कचरा हटविला. सदर बाजार २ मध्ये २६ कर्मचाऱ्यांनी बोथराभवन, डॉ. सचदेव घरामागील परिसर, गोपिकिशन नगर, संतोषीमाता रोड ते इगल हॉटेल गणेश जीन, सदर बाजार ३ मध्ये २५ कर्मचाऱ्यांनी बक्कलगुडा, मुश्ताकभाई यांचे घर, टेकूर यांचे घर परिसर, कोंडवाडा ते सावरकर चौक, बोथरा भवन ते मामा चौक मार्ग येथे सफाई केली.४काद्राबाद मध्ये ५० कर्मचाऱ्यांनी बन्सीपूरा, पाटणी चौक, उबाळे ते पाटणी चौक, गवळीपुरा मामा चौक ते सावरकर चौक, मामा चौक ते महावीर चौक या भागातील कचरा हटविला. ४७ कर्मचाऱ्यांनी मुथा बिल्डिंग, चिटणीस बिल्डिंगपर्यंत, सीटीएमके परिसर आदी भागात राबविली.