शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना नैसर्गिक विधीची धास्ती !

By admin | Updated: January 8, 2017 23:53 IST

जालना जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा

हरी मोकाशे जालनानैसर्गिक साद आली की त्यास प्रतिसाद द्यावाच लागतो. परंतु, जालना शहरात पाय ठेवलेल्यांना धास्ती असते ती नैसर्गिक साद आल्यास त्याला कुठे प्रतिसाद द्यावा. शहरात केवळ दोनच सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने अडोश्याची जागा पाहून ‘मोकळे’ व्हावे लागते. हागणदरीमुक्तीचा गवगवा करणाऱ्या नगर पालिकेचे नियोजन मात्र कागदावरच राहात असल्याचे पहावयास मिळत आहे.औद्योगिक क्षेत्रामुळे विविध साहित्य खरेदीसाठी शहरात दररोज हजारो व्यापाऱ्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणामुळे विविध कामांसाठी ये- जा करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, शहरात दाखल होणाऱ्यांना भिती असते ती लघुशंकेची. शहरात केवळ दोन ठिकाणीच सुलभ शौचालये असल्याने परगावाहून आलेल्यांची धावाधावच सुरु असल्याचे पहावयास मिळते.शहरातील फुलबाजार, भोकरदन नाका, मामा चौक, पाणीवेस, गरीबशहा बाजार, मम्मादेवी चौक, शनि मंदिर, सराफा बाजार, महात्मा फुले मार्केट, अलंकार चौक, टांगा थांबा यासह जुन्या जालना शहरातील शनि मंदिर, भाजी मंडई आणि गस्तगड हे नेहमी गजबजलेले प्रमुख चौक असतात. परंतु, या ठिकाणी ना स्वच्छतागृह ना लघुशंका. त्यामुळे येथे आलेल्या नागरिकांना लघुशंका आल्यास भीतीच बसते. ती उरकण्यासाठी चक्क उघड्या जागेचा वापर करावा लागतो. स्वच्छतागृह, लघुशंकागृह नसल्याचे महिलांची मोठी कुचंबना होत आहे.तीन ठिकाणी नियोजन...शहरात सध्या १० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातील काहींची पडझड झाली असल्याने बंद आहेत. तसेच चार- पाच ठिकाणी लघुशंकागृहे असली तरी त्यातील दोन मोडकळीस आली आहेत. सध्या स्वच्छतेचा सर्व्हे सुरु असून फुले मार्केट, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे नियोजन असल्याचे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता रत्नाकर अडसरे यांनी सांगितले.