पानचिंचोली : निलंगा तालुक्यातील पानचिंचोली व परिसरात डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळले आहेत़ उपचाराबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र व स्वच्छतेबाबत पानचिंचोली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसून येत आहे़पानचिंचोली हे तालुक्यापासून दूर तर जिल्ह्याच्या जवळ असलेले सात ते आठ हजार लोकवस्तीचे गाव आहे़ मोठी बाजारपेठ असलेल्या या गावात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ जागोजागी साचलेल्या डबक्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे़ बसस्थानक, धार्मिक स्थळांजवळ अधिक प्रमाणात कचरा साचला आहे़ परिणामी साथीच्या आजाराने डोके वर काढले असून डेंग्यु सदृश्य आजाराची रुग्ण संख्या वाढली आहे़ पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगत आहेत़ तसेच ग्रामपंचायत प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे डेंग्यु सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत़ पानचिंचोली येथील विश्वनाथ लिंबाजी हणमंते हे या भागात मलेरीया डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असून ते स्वत:च डेंग्यु सदृश्य आजाराने ग्रस्त आहेत़ सध्या ते लातूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले़ (वार्ताहर)
पानचिंचोलीत डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती
By admin | Updated: September 16, 2014 01:31 IST