चाकूर : चाकूर पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगिण विकास हेच ध्येय राहणार आहे़ या विकासातून चाकूर पंचायत समितीचा मराठवाड्यात एक आदर्श निर्माण करणार असल्याचा विश्वास पंचायत समितीचे नूतन सभापती करीमसाब गुळवे यांनी व्यक्त केला़ यावेळी ते पंचायत समितीत आयोजित अधिकारी-कर्मचाऱ्याच्या बैैठकीत बोलत होते़ यावेळी त्यांनी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती रहावी़ यासाठी डंपींग बायोमशिन लवकरच बविण्यात येईल, दौऱ्यावरील कर्मचारी वर्गाच्या नोंदी ह्या खालच्या रजिस्टरला झाल्या पाहिजेत़ पंचायत समितीतून स्वच्छतेची मोहिम राबविली जाते़ परंतु, हाच परिसर स्वच्छ आहे़ आठवडाभरात पंचायत समितीचा परिसरही स्वच्छ केला जाईल़ पंचायत समितीमध्ये तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांची कामे आली पाहिजेत़ नागरिकांना व्यर्थ हेलपाटे घालण्याची वेळ नागरिकांना येणार नसल्याचेही ते म्हणाले़ घरकुल योजनेच्या कामासाठी कोणत्याही नागरिकांवर पैैसे देऊन काम करून घेण्याची वेळ येणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली़ तसेच कार्यालयातील काम जलद गतीने आणि पारदर्शक व्हावे, यासाठी चाकूर पंचायत समितीच्या माध्यमातून एक वेगळा ठसा निर्माण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ पंचायत समिती परिसरात यापुढील कालावधीत वृक्षारोपणावर भर दिला जाणार असून, या परिसरामध्ये नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न नूतन सभापती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ तसेच माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील यांचा कामाबाबतचा दूरदृष्टीकोन लक्षात घेऊन त्याच धर्तीवर जनतेच्या हिताची कामे केली जाणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले़ यावेळी पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती़ नूतन सभापतींच्या कार्याची चूणुक पदाधिकाऱ्यांना लक्षात येत असल्याने पंचायत समितीचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची चर्चा आहे़ (वार्ताहर)
चाकूर पंचायत समितीचा मराठवाड्यात आदर्श !
By admin | Updated: September 22, 2014 00:54 IST