शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

तीन पालिकांचे अध्यक्ष बिनविरोध !

By admin | Updated: July 11, 2014 01:00 IST

जालना : जालना, अंबड, भोकरदन या तीन नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे.

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन या तीन नगर पालिकांच्या नगराध्यक्षपदी आज नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रत्येकी एकमेव उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याने नगराध्यक्षांची निवड बिनविरोध होणे निश्चित झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी असून परतूर पालिकेत मात्र तीन उमेदवारांचे अर्ज आल्याने तेथे लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या नगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागलेले आहे. जालना नगरपालिकेत गुरूवारी सकाळी काँग्रेसच्या सदस्या पार्वताबाई रत्नपारखे यांनी आपले दोन नामनिर्देशन अर्ज उपविभागीय अधिकारी मनीषा मुथा यांच्याकडे दाखल केले. रत्नपारखे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. पालिकेत प्रतिस्पर्धी शिवसेना-भाजपा युतीकडे मागासवर्गीय महिला प्रवर्गातील उमेदवारच नव्हता.दरम्यान, रत्नपारखे यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर राकाँचे माजी खा. अंकुशराव टोपे, आ. कैलास गोरंट्याल, मावळत्या नगराध्यक्षा पद्मा भरतिया, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल हाफिज आदींनी स्वागत केले. (प्रतिनिधी)परतूरला रस्सीखेचपरतूर : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरविकास आघाडीच्या दोन तर काँग्रेसच्या एक अशा एकूण तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने लढत होणार असल्याचे चित्र आहे.नगरविकास आघाडीच्या वतीने सुनंदाबाई शहाणे व मंगेश डहाळे यांनी तर काँग्रेसच्या वतीने माजी नगराध्यक्षा करीमाबी शेख यांनी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षपदाची निवडणूक १६ जुलै रोजी होणार आहे. १८ सदस्य असलेल्या या पालिकेत नगरविकास आघाडीचे ११, काँग्रेसचे ६ तर भारतीय जनता पक्षाचा एक असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. भोकरदन नगराध्यक्षपदी पगारे विराजमान होणारभोकरदन : नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रेखा चंद्रकांत पगारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. भोकरदन पालिकेचे अध्यक्षपद हे अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत असताना त्यांच्याकडे या प्रवर्गातील उमेदवार नव्हता. त्यामुळे अध्यक्षपद हे कॉग्रेकडे जाणार हे जवळपास निश्चित होते. काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी रेखाताई पगारे व राजू खिरे हे दोन उमेदवार होते. मात्र काँग्रेसचे मुरब्बी नेते माजी नगराध्यक्ष अ‍ॅड हर्षकुमार जाधव यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र आणून या दोन्ही नगरसेवकांमध्ये एकमत घडवून आणले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पगारे यांचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाध्यक्ष भीमराव डोगंरे यांनी अध्यक्षपदासाठी पगारे यांना उमेदवारी जाहीर केली होती़ १० जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एऩआऱशेळके यांच्याकडे रेखाताई पगारे यांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. शेळके यांनी सर्व अर्ज वैध झाल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांना मुख्याधिकारी रफीक सय्यद, श्यामराव दांडगे, आडे यांनी सहकार्य केले़कार्यकर्त्यांचा जल्लोषनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रेखाताई पगारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी न.प. कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी पगारे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. हर्षकुमार जाधव, तालुकाध्यक्ष सुरेश तळेकर, निरीक्षक सुरेश गवळी, गटनेते सईद कादरी, माजी नगरअध्यक्षा कमल जेठे, राजू खिरे, इरफान सिद्यिकी, रफिकउद्दीन, एजाज पठाण, राजू गाढे, चंद्रकांत पगारे, अझहर शहा, सुरेश जेठे, अ‍ॅड. सुहास देशमुख, जफर सेठ, छोटूसेठ आदी उपस्थित होते.आता उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक १६ रोजी होणार असल्याने तालुकावासियांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुकावासियांचे लक्ष नगरपालिकेच्या निवडणुकांकडे लागले होते. (वार्ताहर)अंबडला पुन्हा कटारेचअंबड : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या आज शेवटच्या तारखेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंगलताई कटारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांनी नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आता केवळ औपचारिकता राहिली आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करीत विद्यमान नगराध्यक्षा मंगलताई काकासाहेब कटारे यांनाच पुन्हा नगराध्यक्षपदी संधी दिली आहे. यंदा पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसच्या सहाही नगरसेविका नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक होत्या. यामध्ये कटारे यांच्यासह वैशाली सुनील राऊत, वैशाली राजेश सावंत, शेख मल्लेका शाहेद, ललिता जितेंद्र बुर्ले व सुमनबाई संजय साळवे यांचा समावेश होता. मात्र आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत केवळ कटारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. कटारे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यातील एक वैध तर दुसरा अवैध ठरविण्यात आला. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर हे काम पाहत आहेत. आगामी विधानसभेच्या राजकीय पार्श्वभूमीवर पालकमंत्री टोपे हे अंबड नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देतात, याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र टोपे यांनी कटारे यांना संधी देत भल्याभल्यांचे अंदाज चुकविले. १६ जुलै रोजी या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याच दिवशी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. (वार्ताहर)