शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

सेनेत गटबाजीला खतपाणी

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शिवसेनेत गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रकार आता जोमाने सुरू झाला असून खा. चंद्रकांत खैरे यांच्या गैरहजेरीत आज महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी

औरंगाबाद : शिवसेनेत गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रकार आता जोमाने सुरू झाला असून खा. चंद्रकांत खैरे यांच्या गैरहजेरीत आज महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी जुन्या अडगळीला पडलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला. संपर्क नेते विनोद घोसाळकर यांनी तर खा. खैरे अधिवेशनासाठी दिल्लीला आहेत, आमच्यात भांडणे लावून देण्याचा प्रयत्न माध्यमांनी करू नये, असा खुलासा करीत खैरे गैरहजर असल्याचे सर्वांच्या लक्षात आणून दिले. मुंबईतील मंडळीच पक्षात गटबाजीला खतपाणी घालीत असल्याचा सूर काही जणांनी यावेळी आळविला. माजी महापौर शीला गुंजाळे, सुनंदा कोल्हे, माजी उपमहापौर ज्योत्स्ना हिवराळे, माजी नगरसेविका पद्मा शिंदे, राधाबाई तळेकर, रजनी जोशी, कला बोरामणीकर, माजी नगरसेवक प्रदीप दत्त, शिवाजी गावडे, मधुकर शिंदे, संतोष शेंडगे, विनोद सोनवणे, विजय वाघमारे, शोभा मीटकर आदींसह जुन्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. मनपा निवडणुकीच्या तोंडावर आणि भाजपा, एमआयएमच्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेने जुन्या शिवसैनिकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्षाला नवचैतन्य यानिमित्त प्राप्त होत असले तरी यंगब्लड अजून इतर पक्षांकडेच आहे. जैस्वाल यांनी जुन्या सेना पदाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बैठकीला बोलाविले होते. ४जे शिवसैनिक प्रवाहाबाहेर गेले, ते परत आले आहेत. २० वर्षे जुन्या पदाधिकाऱ्यांनी लाठ्या- काठ्या खालल्या. घरांवर तुळशीपत्र ठेवले. आज बोलाविल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. भाजपा, एमआयएमसह इतर पक्ष शिवसेनेच्या विरोधात आहेत, असे आ. शिरसाट म्हणाले.