बदनापूर : तालुक्यातील वाघ्रुळ दा व निकळक येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तालुक्यातील वाघ्रुळ दा येथील रंजनाबाई विठ्ठल जुंबड या महिलेस दि ७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर तिला मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. ती समजावण्यास गेली असता तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण करून तिला गंभीर जखमी करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तु राजाराम जुंबड व वंदना दत्तु जुंबड (दोघे रा. वाघ्रुळ) यांच्या विरूद्ध बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउपनि गुसिंगे हे करीत आहेत.निकळक येथील बंडू कारभारी इंगळे दि. ७ एप्र्र्र्र्र्र्र्र्र्रिल रोजी आपल्या शेतात बैल बांधण्यासाठी गेला असता मागील भांडणाच्या कारणा वरून त्यास काठीने व कु-हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले.
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST